आमिर खानने पहिल्यांदाच नव्या गर्लफ्रेंडसोबत केलं खास फोटोशूट, अभिनेत्याच्या रोमँटिक अंदाजाने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:30 IST2025-04-13T12:30:29+5:302025-04-13T12:30:57+5:30
आमिर खान पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका पब्लिक इव्हेंटमध्ये दिसला. त्यावेळी आमिरने गर्लफ्रेंडसोबत केलेलं फोटोशूट चर्चेत आहे (aamir khan)

आमिर खानने पहिल्यांदाच नव्या गर्लफ्रेंडसोबत केलं खास फोटोशूट, अभिनेत्याच्या रोमँटिक अंदाजाने वेधलं लक्ष
आमिर खान (aamir khan) हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता. आमिरने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आमिरने काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवशी नवीन गर्लफ्रेंडला सर्वांसमोर आणलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. किरण रावशी घटस्फोट झाल्यावर आमिर सध्या कोणाला डेट करतोय, याचा खुलासा त्याने केला. अशातच नुकतंच एका इव्हेंटमध्ये पहिल्यांदा आमिर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. इतकंच नव्हे त्याने खास फोटोशूटही केलं.
पहिल्यांदाच आमिर खान दिसला गर्लफ्रेंडसोबत
आमिर खान त्याची गर्लफ्रेंड गौरीसोबत मकाऊ इंटरनॅशनलल कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. यावेळी आमिरने खास पारंपरिक पेहराव केला होता. तर त्याची गर्लफ्रेंड गौरी साडीत दिसली. चायनीज अभिनेता शेन टेंग आणि मा ली यांच्यासोबत आमिरने स्टेज शेअर केला. या फेस्टिव्हलमध्ये आमिर आणि गौरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्यांदाच आमिर गौरीला घेऊन एका जाहीर इव्हेंटमध्ये एकत्र आला. आमिर आणि गौरीने एकमेकांचा हात पकडला होता.
AamirKhan in Macao just now!!!#aamirkhanpic.twitter.com/iAa7A2nNL5
— 𝓙𝓾𝓵𝓵𝓮𝓸𝓿𝓸 (@ITSS_ALLGOODMAN) April 12, 2025
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित कलाकारांसोबत आमिरने गप्पा मारल्या. गौरी सुद्धा यावेळी सर्वांशी दिलखुलास बोलताना दिसली. त्यानंतर हाताच्या साहाय्याने दिल दाखवून आमिर आणि गौरीने खास फोटोशूट केलं. आमिर आणि गौरीचा हा खास अंदाज सर्वांना चांगलाच आवडलेला दिसला. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आमिरच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमाची सर्वांना खूप उत्सुकता आहे.