'लापता लेडीज'साठी आमिर खानने दिलेल्या ऑडिशनची क्लीप व्हायरल, नेटकरी म्हणतात- "रवी किशनच बेस्ट"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:48 IST2025-03-27T11:48:25+5:302025-03-27T11:48:50+5:30
आमिरने 'लापता लेडीज'साठी दिलेल्या ऑडिशनची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही पाहा

'लापता लेडीज'साठी आमिर खानने दिलेल्या ऑडिशनची क्लीप व्हायरल, नेटकरी म्हणतात- "रवी किशनच बेस्ट"
आमिर खान (aamir khan) हा बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. आमिर खानची निर्मिती असलेला 'लापता लेडीज' (laapataa ladies) हा सिनेमा चांगलाच गाजला. प्रेक्षक-समीक्षकांनी सिनेमाचं चांगलंच कौतुक केलं. इतकंच नव्हे तर 'लापता लेडीज' सिनेमा यंदाच्या ऑस्करसाठीही शर्यतीत होता. या सिनेमात रवी किशनने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. रवी किशनआधी (ravi kishan) ही भूमिका आमिर खान साकारणार होता. त्यासाठी आमिरने ऑडिशनही दिलेली. याच ऑडिशनची व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
आमिर खानची ऑडिशन क्लीप
'लापता लेडीज'साठी आमिरने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आमिर 'लापता लेडीज'मधील पोलीस अधिकारी श्याम मनोहरसाठी ऑडिशन देताना दिसतोय. पान खाऊन, बिहारी-भोजपुरी स्टाईलमध्ये संवाद बोलत, पोलीस अधिकाऱ्याची वर्दी परिधान करत आमिर ऑडिशन देताना दिसतोय. आमिरची ऑडिशन क्लीप व्हायरल होताच नेटकऱ्यांना रवी किशनची या रोलसाठी योग्य निवड होती, हे जाणवलं. नेटकऱ्यांनी तशा कमेंटही केलेल्या दिसल्या.
आमिरची ऑडिशन पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स
आमिर खानची ऑडिशन क्लीप पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत की, "आमिरने रवी किशनला या रोलसाठी निवडून चांगलं काम केलं". "आमिर या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकला नसता.", "आमिर एक चांगला अभिनेता आहे पण रवी किशनने ही भूमिका चांगली निभावली आहे. रवी किशनच या भूमिकेसाठी योग्य होते," अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 'लापता लेडीज' सिनेमा किरण रावने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने चांगली प्रशंसा मिळवली.