Aamir Khan: यशराजच्या 'स्पायव्हर्स'मध्ये तिसऱ्या खानची वर्णी; सलमान-शाहरुखनंतर आमिरला दिसणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 20:41 IST2023-02-05T20:36:34+5:302023-02-05T20:41:27+5:30

Aamir Khan In YRF Spy Universe: 'पठाण'च्या जबरदस्त कामगिरीनंतर यशराज फिल्म्सने आपल्या स्पाय युनिव्हर्सवर लक्ष केंद्रित केले आहे.

Aamir Khan: Aamir Khan's entry in YashRaj's 'Spyvers'; After Salman-Shah Rukh, Aamir will be seen | Aamir Khan: यशराजच्या 'स्पायव्हर्स'मध्ये तिसऱ्या खानची वर्णी; सलमान-शाहरुखनंतर आमिरला दिसणार...

Aamir Khan: यशराजच्या 'स्पायव्हर्स'मध्ये तिसऱ्या खानची वर्णी; सलमान-शाहरुखनंतर आमिरला दिसणार...

Salman Shah Rukh And Aamir: 'पठाण' चित्रपटाच्या जबरदस्त यशाने यशराज फिल्म्सचा गेल्या दोन वर्षांचा दुष्काळ मिटला आहे. यानंतर आता निर्माते स्पाय युनिव्हर्स चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दीड वर्षात यशराज फिल्म्सचे 'बंटी और बबली 2', 'जयेशभाई जोरदार', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'शमशेरा'सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. चारही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि कमकुवत कथेमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटांना नाकारले. 'पठाण'ची कथाही कमकुवत होती, पण शाहरुख खान आणि कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चित्रपट हिट झाला.

यशराजचा पुढचा चित्रपट 'टायगर 3' आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'पठाण'चे यश पाहून प्रेक्षकही YRFकडे स्पाय युनिव्हर्सची मागणी करत आहेत. पठाणच्या रिलीजपूर्वीच यशराज फिल्म्सने आपल्या स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली होती. टायगरमध्ये सलमान खान, पठाणमध्ये शाहरुख खान, वॉरमध्ये हृतिक रोशन लीडमध्ये होते. आता यशराजच्या आगामी स्पाय चित्रपटात तिसऱ्या खानची वर्णी लागू शकते. हा तिसरा खान म्हणजे, आमिर खान असेल. 

पठाणचे संवाद लेखक अब्बास टायरवाल यांनी सांगितले की, आदित्य चोप्रा आगामी काळात आमिर खानला त्यांच्या स्पाय युनिव्हर्समध्ये घेऊ शकतात. एखादी चांगली कथा मिळाल्यावर यशराज नक्कीच आमिरला चित्रपट ऑफर करेल. सध्या वॉर 2 आणि पठाण 2 ची योजना नाही, पण भविष्यात याचे सीक्वेल नक्की येतील. यशराज बॅनरखाली 2018 मध्ये बनलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मोठा फ्लॉप ठरला होता. या चित्रपटातून यशराज आणि आमिर दोघांचेही आर्थिक नुकसान झाले होते. पण, आता जुन्या गोष्टी विसरुन हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात. 

Web Title: Aamir Khan: Aamir Khan's entry in YashRaj's 'Spyvers'; After Salman-Shah Rukh, Aamir will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.