Team India साठी ए आर रहमानने शेअर केला व्हिडिओ, खास गाण्याने साजरा केला जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 19:46 IST2024-06-30T19:45:24+5:302024-06-30T19:46:10+5:30
टीम इंडियासाठी ए आर रहमानचा खास परफॉर्मन्स!

Team India साठी ए आर रहमानने शेअर केला व्हिडिओ, खास गाण्याने साजरा केला जल्लोष
T20 world cup मध्ये काल भारताने दणदणीत विजय मिळवला. तब्बल १७ वर्षांनी टीम इंडियाने ट्रॉफी जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. विराट कोहली, हार्दिक पांड्या, बुमराह, सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंनी फायनलमध्ये जान आणली. अजूनही टीम इंडियासाठी क्रिकेटरसिकांचं सेलिब्रेशन सुरुच आहे. दरम्यान ग्रेट संगीत दिग्दर्शक ए आर रहमानने (A R Rahman) टीम इंडियासाठी खास व्हिडिओ शेअर केला.
काही महिन्यांपूर्वी अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये 'टीम इंडिया है हम' हे गाणं होतं. त्याच गाण्यावर स्वत: परफॉर्म करतानाचा व्हिडिओ ए आर रहमानने शेअर केला आहे. स्टेजवर बॅकग्राऊंड गायकांच्या साथीने त्याने परफॉर्मन्स दिला. खास टीम इंडियाच्या कालच्या विजयासाठी त्याने हा व्हिडिओ डेडिकेट केला. तो लिहितो, "भारताच्या विश्वकप विजयाचा जल्लोष. टीम इंडिया गाण्यावरील हा परफॉर्मन्स एन्जॉय करा."
रहमानचा गाण्यातला दमदार आवाज, ऊर्जा सगळंच अफलातून आहे. अशीच काल मॅचदरम्यान भारतीय संघाची ऊर्जा होती आणि क्रिकेटरसिकांचीही. संपूर्ण जगाने उत्कंठावर्धक सामना बघितला आणि भारताने आपणच वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं दाखवून दिलं.