चाहता सेल्फी घ्यायला जवळ आला, अचानक रितेशने कॅमेरावर हात फिरवला अन् पुढे...; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:18 IST2025-10-19T10:14:36+5:302025-10-19T10:18:32+5:30
एक चाहता सेल्फी काढण्यासाठी रितेशजवळ आला. त्यावेळी रितेशने केलेल्या छोट्याश्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं

चाहता सेल्फी घ्यायला जवळ आला, अचानक रितेशने कॅमेरावर हात फिरवला अन् पुढे...; व्हिडीओ व्हायरल
रितेश देशमुख हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. रितेशने त्याच्या सिनेमांमधून चाहत्यांंचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. रितेशवर त्याचे चाहतेही चांगलंच प्रेम करताना दिसतात. रितेश सुद्धा कधीही त्याच्या फॅन्सना नाराज करत नाही. रितेशचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रितेशसोबत एक चाहता सेल्फी घ्यायला आला. पुढे रितेशने केलेल्या कृतीने सर्वांचं मन जिंकलंय. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रितेशच्या कृतीने जिंकलं सर्वांचं मन
सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रितेश त्याच्या गाडीजवळ उभा असतो. तेव्हा एक चाहता सेल्फी काढण्यासाठी रितेशजवळ येतो. परंतु काही कारणास्तव त्याचा सेल्फी नीट निघत नाही. तेव्हा रितेश त्या चाहत्याच्या फोनचा कॅमेरा साफ करतो. त्यानंतर सेल्फीसाठी पोज देतो. रितेशच्या छोट्याश्या कृतीने सर्वांचं मन जिंकलंय. रितेशचा नम्र स्वभाव आणि तो चाहत्यांची किती काळजी घेतो, हे यावरुन पाहायला मिळतंय.
रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२५ या वर्षात रितेशचे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. रितेशचे 'रेड २' (Raid 2) आणि 'हाऊसफुल ५' (Housefull 5) हे दोन्ही चित्रपट हिट झाले आहेत. या यशामुळे तो सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. रितेश सध्या 'मस्ती ४', 'धमाल ४' या सिनेमांचं शूटिंग करतोय. 'मस्ती ४' लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय रितेशचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'राजा शिवाजी'ची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे.