९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 15:06 IST2024-02-29T15:05:12+5:302024-02-29T15:06:31+5:30

आलिया आणि रणबीर यांचा हा फोटो 'बालिका वधू' सिनेमाच्या ऑडिशनचा आहे.

A black and white photo of 9 year old Alia Bhatt goes viral with 20 year old Ranbir Kapoor | ९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

९ वर्षांच्या आलियाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल, २० वर्षीय रणबीरच्या खांद्यावर ठेवलं डोकं

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia bhatt) हे बॉलिवूडमधलं मोस्ट रोमँटिक कपल आहे.  आलिया सुरुवातीपासूनच रणबीरची चाहती होती हे तिने अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे. नंतर रणबीरच तिच्या आयुष्याचा साथीदारही झाला.  दोघांमध्ये तब्बल ११ वर्षांचं अंतर आहे. रणबीर आणि आलियाचा एक जुना फोटो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये रणबीर २० वर्षांचा तर आलिया फक्त ९ वर्षांची आहे.

रणबीर आणि आलियाचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. ९ वर्षांच्या आलिया नवरीच्या वेशात रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. तिच्या चेहऱ्यावर गोंडस हसूही आहे.तर रणबीर वेगळ्याच विचारांमध्ये बुडालेला दिसतोय. हा फोटो 'बालिका वधू' सिनेमाचा ऑडिशनवेळचा आहे. संजय लीला भन्साळी हा सिनेमा करणार होते ज्यात या दोघांना कास्ट करण्यात आलं होतं. मात्र नंतर सिनेमा होऊ शकला नाही. तरी आलियाला लहानपणापासूनच रणबीरबाबत आकर्षण वाटलं. हा फोटो त्यांच्या घरी फ्रेम करुनही ठेवलेला आहे.

चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत दोघांचं नशीब आधीपासूनच लिहिलं होतं असं म्हटलं आहे. अनेक जण फोटो किती क्युट आहे अशी कमेंट करत आहेत. तर काहींनी मात्र याला भीतीदायकही म्हटलं आहे. एवढीशी मुलगी २० वर्षांच्या मुलासोबत पाहून त्याला रोमँटिक म्हणणं किती भीतीदायक आहे असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

रणबीर आणि आलिया यांना आता एक वर्षाची लेक आहे जिचं नाव राहा आहे.  सध्या राहाने सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तिचे निळे डोळे पाहून अनेकांना राज कपूर, ऋषी कपूर यांचीच आठवण झाली आहे. 

 

Web Title: A black and white photo of 9 year old Alia Bhatt goes viral with 20 year old Ranbir Kapoor