57 किलोच्या उर्वशी रौतेलाने जीममध्ये उचलले 80 किलोचे वजन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:20 IST2020-06-01T18:13:25+5:302020-06-01T18:20:24+5:30
अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

57 किलोच्या उर्वशी रौतेलाने जीममध्ये उचलले 80 किलोचे वजन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिला फोटो व व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यातही ती ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल देखील सुनावते. उर्वशीने इन्स्टाग्रामवर तिने एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशी 80 किलो वजनाची डंबेल्स उचलताना दिसतेय. या व्हिडीओत ती ग्लूट वर्कआऊट करताना दिसतेय. उर्वशी फिटनेसला घेऊन नेहमीच सतर्क दिसते. 57 किलोची उर्वशी जिममध्ये 80 किलोचे डंबेल्स उचलताना दिसतेय. उर्वशीच्या या व्हिडीओवर बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत.
उर्वशीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी रूपयांची मदत केली. विशेष म्हणजे एका डान्स मास्टरक्लासच्या माध्यमातून तिने ही रक्कम उभी केली आणि नंतर गरजुंना दान केली.
उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. २०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.