रोहित शेट्टीनं घेतली '12th Fail' रिअल हिरो मनोज शर्मांची भेट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:12 PM2024-01-09T12:12:24+5:302024-01-09T12:13:46+5:30

रोहित शेट्टीने  मनोज कुमार शर्मा यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

12th Fail: Rohit Shetty meets real-life IPS Manoj Kumar Sharma, Vikrant Massey reacts | रोहित शेट्टीनं घेतली '12th Fail' रिअल हिरो मनोज शर्मांची भेट, म्हणाला...

रोहित शेट्टीनं घेतली '12th Fail' रिअल हिरो मनोज शर्मांची भेट, म्हणाला...

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित विक्रांत मेसी स्टारर चित्रपट '12th Fail'  सध्या चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. केवळ विक्रांत मेसीच नाही तर चित्रपटातील रिअल लाईफ हिरो IPS मनोज कुमार शर्मादेखील प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. नुकतेच दिग्दर्शक रोहित शेट्टीने मनोज कुमार शर्मा यांची भेट घेतली. 

रोहित शेट्टीने  मनोज कुमार शर्मा यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच त्याने एक विशेष नोट देखील लिहिली. रोहित म्हणाला, '12th Fail'फेल” चे खरे हिरो मनोज कुमार शर्मा यांच्याशी भेट झाली. कोविड काळात त्यांच्याबरोबर काम करण्याचा मान मिळाला होता. त्यावेळी ते मुंबई पोलिस सेवेत होते. जर तुम्ही '12th Fail' चित्रपट पाहिला नसेल तर कृपया पाहा… ही एक प्रेरणादायी कथा आहे, विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांसाठी ही एक प्रेरणादायी कथा आहे'. रोहित शेट्टीच्या या पोस्टवर विक्रांत मेसीनेही ‘The two of you!!!’ अशी कमेंट केली आहे. 

 '12th Fail'  हा २०२३ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी हा एक आहे.  अनेक बिग बजेट चित्रपटांसमोरही हा सिनेमा टिकून राहिला. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर आता  '12th Fail'  हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म आला आहे. त्यामुळे जर तुम्ही चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला नसेल तर आता तुम्ही घरी बसून हा चित्रपट पाहू शकता. विक्रांत मेसी अभिनीत हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.  सुमारे 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 66 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.

Web Title: 12th Fail: Rohit Shetty meets real-life IPS Manoj Kumar Sharma, Vikrant Massey reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.