'शुद्ध देसी रोमान्स'ला १० वर्ष पूर्ण, परिणीती चोप्राने सुशांतच्या आठवणीत लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 15:52 IST2023-09-06T15:50:51+5:302023-09-06T15:52:21+5:30
वेळ किती लवकर निघून जाते. शुद्ध देसी रोमान्सला १० वर्ष पूर्ण झाली....

'शुद्ध देसी रोमान्स'ला १० वर्ष पूर्ण, परिणीती चोप्राने सुशांतच्या आठवणीत लिहिली खास पोस्ट
2013 साली आलेला 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमा आठवत असेलच. सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आणि परिणिती चोप्राची (Parineeti Chopra) फ्रेश जोडी या सिनेमातून समोर आली. मनीष शर्मा दिग्दर्शित या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेमाच्या आठवणी ताज्या करत परिणीतीने खास पोस्ट शेअर केली आहे.
परिणीतीची लिहिते , 'वेळ किती लवकर निघून जाते. शुद्ध देसी रोमान्सला १० वर्ष पूर्ण झाली. मजा, बिझी शूट पण हळव्या क्षणांनी सिनेमाच्या आठवणी भरलेल्या आहेत. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव छानच होता. ऋषि सर आम्ही तुम्हाला मिस करतो. सुशांत तुझी तर खूपच जास्त आठवण येते. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तू एक होतास.'
परिणीतीने या पोस्टसोबत बीटीएस व्हिडिओही शेअर केला. सिनेमाच्या सेटवर सुशांत, परिणीती आणि वाणी कपूरने कॅमेऱ्यामागे केलेली मस्ती यामध्ये दिसते. चाहत्यांनी पोस्टखाली कमेंट करत सुशांतची आठवण काढली आहे. 'सुशांत तुझी खरंच खूप आठवण येते,'या सिनेमाचं एक वेगळंच आकर्षण होतं. सुशांत खूप आठवतो' अशा कमेंट्स केल्या आहेत.
परिणीतीबद्दल सांगायचं तर, ती लवकरच राघव चड्डासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. या महिन्याच्या शेवटी २५ सप्टेंबर रोजी लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न सोहळा होणार आहे.