प्रदर्शनाच्या १ दिवस आधीच सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; समोर आलं मोठं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:36 IST2025-06-27T13:34:14+5:302025-06-27T13:36:25+5:30

स्पर्धा टाळण्यासाठी 'निकिता रॉय' सिनेमाच्या तारखेत बदल? सोनाक्षी सिन्हाने खरं कारण सांगितलच

bollywood actress sonakshi sinha nikita roy movie release date postponed know the reason | प्रदर्शनाच्या १ दिवस आधीच सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; समोर आलं मोठं कारण 

प्रदर्शनाच्या १ दिवस आधीच सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; समोर आलं मोठं कारण 

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिच्या आगामी चित्रपट 'निकिता रॉय'मुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते प्रचंड उत्सुक होते. पण, आता या चित्रपटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रदर्शनाच्या पूर्वीच चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. यामागे नेमकं काय कारण आहे. याबद्दल स्पष्टीकरण देत निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 



सोनाक्षीचा 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस' हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. विशेष म्हणजे हा चित्रपट तिचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट एक रहस्यमय थ्रिलर आहे आणि सोनाक्षी त्यात पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट येत्या १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोनाक्षी सिन्हानेही तिच्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय, "आमच्या हितचिंतक आणि निर्मात्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की, हा चित्रपट आता १८ जुलै रोजी प्रदर्शित होईल. जेणेकरून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल." तसेच चाहत्यांना आणखी थोडा वेळ वाट पाहण्याचे आवाहनही तिने केलं आहे.

२७ जूनला एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे 'निकिता रॉय' चित्रपटाला स्क्रीन टाइम मिळत नव्हता. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. थोडक्यात स्पर्धा टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं आहे. 

Web Title: bollywood actress sonakshi sinha nikita roy movie release date postponed know the reason