परिणीती चोप्रा देणार गुडन्यूज? पोस्ट शेअर करत केलं प्रेग्नंसीविषयी भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:57 AM2024-03-29T11:57:33+5:302024-03-29T11:57:59+5:30

Parineeti Chopra: अलिकडेच परिणीतीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.यावेळी तिचा लूक पाहून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागली.

bollywood-actress-pariniti-chopra-finally-express-about-her-pregnancy-rumors-on-instagram-story | परिणीती चोप्रा देणार गुडन्यूज? पोस्ट शेअर करत केलं प्रेग्नंसीविषयी भाष्य

परिणीती चोप्रा देणार गुडन्यूज? पोस्ट शेअर करत केलं प्रेग्नंसीविषयी भाष्य

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. १४ सप्टेंबर २०२३ रोजी तिने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत परिणीतीने लग्नानंतर इंडस्ट्रीतून काढता पाय घेतल्याचं म्हटलं जात होतं. यामध्येच आता तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, या चर्चांवर अखेर परिणीतीने मौन सोडलं आहे.

अलिकडेच परिणीतीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ओव्हर साईज शर्ट आणि जीन्स असा लूक केला होता. मात्र, तिचा हा लूक पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नंसीविषयी चर्चा करायला सुरुवात केली. लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच परिणीती प्रेग्नंट आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडू लागला. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत परिणीतीने स्पष्टीकरण दिलं आहे.

परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “काफ्तान ड्रेस = प्रेग्नंसी, ओव्हरसाईज शर्ट = प्रेग्नंसी आणि कॉम्फी इंडियन कुर्ता = प्रेग्नंसी”, असं म्हणत तिने यावर हसण्याची इमोजी शेअर केली आहे.

दरम्यान, परिणीतीने ही पोस्ट शेअर करत ती प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लवकरच ती चमकीला या आगामी सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांज स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: bollywood-actress-pariniti-chopra-finally-express-about-her-pregnancy-rumors-on-instagram-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.