लग्नाला घरच्यांचा विरोध होता, पण...; किक्रेटर युवराज सिंगने जुळवले 'या' पॉवर कपलचे सूर, अभिनेत्याने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:21 IST2025-12-16T15:17:23+5:302025-12-16T15:21:50+5:30
'या' क्रिकेटपटूनं जुळवले अंगद-नेहा धुपियाचे सूर, लग्नाला घरच्यांचा विरोध होता, पण…; फिल्मी आहे प्रेमकहाणी

लग्नाला घरच्यांचा विरोध होता, पण...; किक्रेटर युवराज सिंगने जुळवले 'या' पॉवर कपलचे सूर, अभिनेत्याने सांगितला किस्सा
Angad Bedi And Neha Dhupia Lovestory: बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपिया हे इंडस्ट्रीतील सर्वाधिक पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. २०१८ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. अंगदला डेट करत असताना अभिनेत्री गरोदर राहिली आणि लागोलाग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.२०१८ मध्येच त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला. यानंतर नेहा धुपियाने एका मुलाला जन्म दिला आहे, ता नेहा आणि अंगदला दोन मुलं आहेत.गेली अनेक वर्ष ते दोघे सुखाने संसार करत आहेत. मात्र, लग्नापूर्वी अंगद आणि नेहाच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. अनेक अडथळे पार करत त्यांचं प्रेम यशस्वी झालं.
नुकतीच अंगद बेदीने मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी नेहा आणि त्याची मैत्री आणि मग या मैत्रीचं कसं प्रेमात रुपांतर झालं, अशी हटके लव्हस्टोरी शेअर केली. संभाषणादरम्यान, मनीषने अंगदला त्याच्या लग्नाविषयी मजेशीर पद्धतीने प्रश्न विचारला. त्याबद्दल बोलताना अंगदने सांगितलं, "दिल्लीतील मालचा मार्गावर एक जिम होती, जिथे माझे मित्र मला घेऊन गेले होते.मी यापूर्वी कधीही अशा प्रकारची जीम पाहिली नव्हती.दरम्यान, मी एका मुलीला ट्रेडमिलवर धावताना पाहिलं."
मग तो म्हणाला, "जेव्हा मी तिला बघितलं, तेव्हा माझे मित्र मला म्हणाले की, "ही मिस इंडिया आहे, तिचं नाव नेहा धुपिया आहे." मी म्हणालो की ती खूप फिट दिसते आणि तिची धावण्याची शैलीही खूप छान आहे.मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना पुन्हा जिममध्ये गेलो, आणि तिसऱ्या दिवशीही पुन्हा गेलो."
क्रिकेटपटू युवराज सिंग केली मध्यस्थी...
अंगद म्हणाला, "युवराज सिंग, जो माझ्यासाठी वडिलांसारखा आहे आणि माझा सर्वात चांगला मित्रही आहे. तो मला एकदा ते मला मुंबईतील एका पार्टीत घेऊन गेला. नेहा सुद्धा तिथे होती. पार्टीनंतर आम्ही सगळे माझ्या घरी गेलो. आम्ही नेहालाही आमंत्रण दिलं होतं. तेव्हाच माझं तिच्याशी व्यवस्थित बोलणं झालं.त्यादरम्यान अभिनेता असंही म्हणाला की, त्याला धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'उंगली' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. नेहा देखील त्या चित्रपटामध्ये होती."त्यानंतर, आम्ही आणखी एक प्रोजेक्ट केला; शिवाय तिने मला एका भूमिकेसाठी ऑफर दिली होती आणि मी लगेच होकार दिला.कारण मला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा होता."
नेहाच्या कुटुंबियांचा लग्नासाठी होता विरोध...
अंगदच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर दिल्लीत परत आल्यानंतर अंगद बेदीने नेहा धुपियाच्या पालकांकडे त्यांच्या मुलीचा हात लग्नासाठी मागितला. मात्र, त्यांनी हा निर्णय नेहावरच सोडला. तो किस्सा शेअर करताना अंगद म्हणाला, मी नेहा स्पष्ट सांगितलं, माझी इंडस्ट्रीत ओळख नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, पण जर तू माझ्याशी लग्न केलेस, तर मी नक्कीच आयुष्यात पुढे जाईन. पण, तिने काहीच उत्तर दिलं नाही.नियतीने या जोडप्याला पुन्हा एकत्र आणले. करण जोहरने त्यांना पुन्हा एकत्र येण्याचा सल्ला दिला.असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला.