बर्थ डे गर्ल कियाराचा बोल्ड लूक; अभिनेत्रीच्या मोनोकिनीची किंमत पाहून सगळेच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 22:32 IST2023-08-01T22:31:18+5:302023-08-01T22:32:57+5:30
kiara advani movies : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने ३१ जुलैला तिचा वाढदिवस साजरा केला.

बर्थ डे गर्ल कियाराचा बोल्ड लूक; अभिनेत्रीच्या मोनोकिनीची किंमत पाहून सगळेच अवाक्
Kiara Advani Monokini Price : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने ३१ जुलैला तिचा वाढदिवस साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत बर्थ डे गर्ल कियाराने आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घातली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी रोमॅंटिक अंदाजात हा खास दिवस घालवला. दरम्यान, कियारा समुद्रात डुबकी मारताना दिसली, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खरं तर कियाराच्या मोनोकिनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
समुद्रात उडी मारत असल्याचा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने काही चारोळ्या लिहल्या. "हॅपी बर्थ डे टू मी, सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद", असं कियाराने कॅप्शनमध्ये म्हटले. तर, सिद्धार्थ मल्होत्राने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कियाराच्या मोनोकिनीची किंमत किती?
रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचे हे कपल सुट्टीसाठी इटलीला गेले होते, जिथे कियाराने तिचा वाढदिवसही साजरा केला. पोहण्याचा आनंद घेताना कियाराने सिल्व्हर डॉट असलेली काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली होती. मोनोकिनीमधील कियाराचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे. कियाराने परिधान केलेली मोनोकिनी नॉर्मा कमली या प्रसिद्ध ब्रँडची आहे, ज्याची किंमत तब्बल ४७,३१७ रूपये एवढी आहे.
किया 'गेम चेंजर'साठी सज्ज
सिद्धार्थ मल्होत्रा 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय तो 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तर, कियारा लवकरच 'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे ज्यामध्ये ती राम चरणसोबत झळकेल. अलीकडेच कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसली होती.