करण जोहरकडून आगामी सिनेमाची घोषणा! जान्हवी कपूरसोबत दिसणार 'हा' हॅण्डसम हंक; पहिल्यांदाच एकत्र करणार काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:47 IST2025-05-29T11:45:21+5:302025-05-29T11:47:11+5:30

करण जोहरच्या आगामी सिनेमात जान्हवी कपूरची 'या' अभिनेत्यासोबत जमणार जोडी

bollywood actress janhvi kapoor and tiger shroff will share screen first time in karan johar upcoming film  | करण जोहरकडून आगामी सिनेमाची घोषणा! जान्हवी कपूरसोबत दिसणार 'हा' हॅण्डसम हंक; पहिल्यांदाच एकत्र करणार काम 

करण जोहरकडून आगामी सिनेमाची घोषणा! जान्हवी कपूरसोबत दिसणार 'हा' हॅण्डसम हंक; पहिल्यांदाच एकत्र करणार काम 

Janhvi Kapoor Upcoming Movie: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर विविध कारणांमुळे चर्चेत असतो. लवकरच तो एक रोमॅन्टिक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नाव लग जा गले... असं आहे. दरम्यान, राज मेहता दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या या आगामी प्रोजेक्टमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच एक हॅंडसम हंक अभिनेता तिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या अभिनेत्याच्या नावावरुन आता पडदा हटवण्यात आला आहे. 

राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि अ‍ॅक्शन सीन्सने परिपूर्ण असणार आहे.२०१८ मध्ये करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात फीमेल लीडमध्ये दिसणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, जान्हवीसोबत अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger shroff) 'लग जा गले' चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान, दोघे पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एक सूडाची प्रेमकथा असेल. त्यामुळे जान्हवी आणि टायगरला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

कधी सुरु होणार शूटिंग? 

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या 'बागी ४' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर जान्हवी कपूर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' सिनेमाचं शूट करत आहे. त्यांच्या या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ते दोघे 'लग जा लागे' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करतील.

Web Title: bollywood actress janhvi kapoor and tiger shroff will share screen first time in karan johar upcoming film 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.