लग्नासाठी सोडली इंडस्ट्री अन् स्विकारला मुस्लिम धर्म, राजकारण्याची सून झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:02 AM2024-04-10T11:02:45+5:302024-04-10T11:06:14+5:30

लग्नासाठी सोडली इंडस्ट्री अन् स्विकारला मुस्लिम धर्म, राजकारण्याची सून झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

Bollywood actress Ayesha Takia Birthday She Quite Her Career After Getting Married In Political Family | लग्नासाठी सोडली इंडस्ट्री अन् स्विकारला मुस्लिम धर्म, राजकारण्याची सून झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

लग्नासाठी सोडली इंडस्ट्री अन् स्विकारला मुस्लिम धर्म, राजकारण्याची सून झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. पण, नंतर त्या इंडस्ट्रीमधून गायबच झाल्या. सध्या मनोरंजन विश्वातील अशीच एक अभिनेत्री चर्चेत आली आहे, जिच्या सौंदर्याचं जगभरात कौतुक झालं. जिचा एकेकाळी इंडस्ट्रीत दबदबा होता. तरुण तर तिच्या प्रेमात ठार वेडे झाले होते. पण आज ती चित्रपटांपासून दूर आपलं आयुष्य घालवत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीनं प्रेमाखातर आपला धर्मही बदलला. आज ही लोकप्रिय अभिनेत्री एका राजकारण्याची सूनदेखील आहे.  

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री  'वाँटेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेली आयशा टाकिया आहे. आयशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केले आहे. लग्नानंतर आयशा बॉलिवूडमधून गायब झाली. आयशाचा शेवटचा चित्रपट मोड होता. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता.

यशाच्या शिखरावर असताना आयशा समाजवादी पार्टी (एसपी) नेते आणि आमदार अबू असीम आझमी यांच्या मुलाच्या प्रेमात पडली. आयशानं फरहानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. तिनं २००९ मध्ये लग्न केले. फरहान आणि आयशा यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर आयशाने चित्रपटात काम करणे बंद केलं आहे. आयशाचे सासरे राजकारणी तर आयशाचा नवरा फरहान हा बिझनेसमन आहे. याशिवाय फरहानला राजकारणातही खूप रस आहे.

आयशानं बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केलं आहे. तिनं करियरची सुरूवात २००४ साली 'टारझन द वंडर कार' चित्रपटातून केली होती. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पाहायला मिळाली. यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. आता आयशा भले ही मायानगरीपासून दूर आहे, तरी ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
 

Web Title: Bollywood actress Ayesha Takia Birthday She Quite Her Career After Getting Married In Political Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.