'यारियाँ' फेम अभिनेत्याच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली 'ड्रीम बाईक', किंमत किती?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:31 IST2025-06-23T12:28:01+5:302025-06-23T12:31:09+5:30

'यारियॉं' फेम अभिनेता झाला बुलेटवाला! 'इतक्या' लाखांची आहे अभिनेत्याची नवी बाईक, पाहिलीत का?

bollywood actor yaariyan fame himansh kohli buy new bullet share glimpse with fans  | 'यारियाँ' फेम अभिनेत्याच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली 'ड्रीम बाईक', किंमत किती?  

'यारियाँ' फेम अभिनेत्याच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली 'ड्रीम बाईक', किंमत किती?  

Himansh Kohli: 'यारियॉं' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli) या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. या चित्रपटातून तो चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या हिमांश सिनेसृष्टीपासून थोडा दुरावला आहे परंतु तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.  अशातच नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकतीच हिमांशने त्याची ड्रीम बाईक खरेदी केली आहे.


आपलं स्वत: चं घर आणि फिरण्यासाठी गाडी असावी असं अनेकांचं स्वप्न असते. यंदाच्या या वर्षात मराठीसह हिंदी कलाविश्वाती बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांचं स्वप्न साकार केलं. या यादीत आता हिमांशचं नाव जोडलं आहे. अभिनेता हिमांश कोहलीच्या घरी नव्या गाडीचं आगमन जालं आहे. सोशल मीडियावर नव्या बुलेटचे फोटो शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

हिमांश कोहलीने होंडाची "Rebel-500' ब्रॅण्ड नावाची नवी बुलेट खरेदी केली आहे. सध्या बाजारात या बुलेटची किंमत ५ लाखांपेक्षा अधिक आहे. जबरदस्त रायडिंगचा अनुभव देणारी ही दुचाकी आहे. लांबचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी बाइकच्या सीटवर जाड फोम जोडण्यात आला आहे. या बाईकला अनेक फीचर्ससह शानदार लुक देण्यात आला आहे.दरम्यान, सोशल मीडियावर नव्या बुलेटचे फोटो पोस्ट करत त्याने झलकही दाखवली आहे. "New baby in the house...", असं कॅप्शन हिमांशने या पोस्टला दिलं आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 

Web Title: bollywood actor yaariyan fame himansh kohli buy new bullet share glimpse with fans 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.