विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:00 IST2025-06-04T16:59:34+5:302025-06-04T17:00:43+5:30

विक्रांत मेस्सीच्या बहुचर्चित 'ऑंखो की गुस्ताखियॉं' चं पहिलं पोस्टर आऊट, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

bollywood actor vikrant massey and shanaya kapoor upcoming film aankhon ki gustakhiyan film frist poster out  | विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

विक्रांत मेस्सीच्या 'ऑंखो की गुस्ताखियॉं'चं पहिलं पोस्टर समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

Aankhon Ki Gustaakhiyan Film: अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Messay)  हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. '१२ फेल', 'हसीन दिलरुबा', 'द साबरमती रिपोर्ट' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. आपल्या सशक्त अभिनयातून सिनेरसिकांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ऑंखो की गुस्ताखियॉं' (Aankhon Ki Gustaakhiyan) असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor ) ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शनाया तिच्या डेब्यू फिल्ममध्ये विक्रांत मेस्सीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 


नुकतंच 'ऑंखो की गुस्ताखियॉं' रोमॅन्टिक चित्रपटाचं पहिली पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसंच चित्रपटाच्या रिलीज डेटवरून पर्दा हटविण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये शनाया लाल रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. तर विक्रांत मेस्सी तपकिरी जॅकेट आणि काळ्या जीन्समध्ये पाहायला मिळतो आहे. शिवाय विक्रातं मेस्सीचा कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसतो आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. येत्या ११ जुलै २०२५ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

संतोष सिंग हे 'ऑंखो की गुस्ताखियॉं' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर मानसी बागला आणि  वरुण बागला यांची निर्मीती आहे. दरम्यान, या चित्रपटाद्वारे विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरची जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांच्या कथेवर आधारलेला आहे. या प्रेमकथेत दोन भिन्न पात्रांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. 

Web Title: bollywood actor vikrant massey and shanaya kapoor upcoming film aankhon ki gustakhiyan film frist poster out 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.