शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' सिनेमा रणदीपने का सोडला? कारण जाणून कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:42 IST2026-01-13T14:40:27+5:302026-01-13T14:42:40+5:30
रणदीप हुड्डाने 'या' बहुचर्चित सिनेमातून घेतली माघार, कारण जाणून कराल कौतुक

शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' सिनेमा रणदीपने का सोडला? कारण जाणून कराल कौतुक
Shahid Kapoor O Romio Movie: बॉलिवूडचा देखणा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापैंकी एक म्हणून शाहिद कपूरला ओळखलं जातं. शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'ओ रोमियो' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात शाहिद नेहमीपेक्षा हटके भूमिका साकारणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा जबरस्त टीझर रिलीज करण्यात आला. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करत आहेत. सध्या या चित्रपटाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्च होताना दिसतेय.
मिडिया रिपोर्टनुसार,'ओ रोमिओ' चित्रपटात शाहिद कपूरची मुख्य भूमिका आहे. तर खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणदीप हुड्डाला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र, काही कारणांमुळे अभिनेत्याने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या काही दिवसांआधीच त्याने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
काय होतं कारण?
सुरुवातीला रणदीपने या भूमिकेसाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्याच्या वैयक्तिक कारणामुळे अभिनेत्याने हा सिनेमा सोडला असल्याचं कळतंय. रणदीप हुड्डा लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी लीन गरोदर आहे. या सगळ्यात कामापेक्षा अभिनेत्याने त्याच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे त्याने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची अपडेट मिळते आहे. रणदीपच्या एक्झिटनंतर या सिनेमात अविनाश तिवारीची एन्ट्री झाली आहे. दरम्यान, विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूर, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया तसेच तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी आणि फरीदा जलाल अशा कलाकरांची फळी पाहायला मिळणार आहे. येत्या १३ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.