"कानून का मालिक है दादा भाई..."; 'रेड-२' मध्ये खलनायक असलेल्या रितेश देशमुखचा लूक समोर

By सुजित शिर्के | Updated: March 25, 2025 13:16 IST2025-03-25T13:12:55+5:302025-03-25T13:16:09+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी चित्रपट 'रेड-२' ची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय.

bollywood actor ajay devgn starrer raid 2 movie new poster out riteish deshmukh will play villain role | "कानून का मालिक है दादा भाई..."; 'रेड-२' मध्ये खलनायक असलेल्या रितेश देशमुखचा लूक समोर

"कानून का मालिक है दादा भाई..."; 'रेड-२' मध्ये खलनायक असलेल्या रितेश देशमुखचा लूक समोर

Raid-2 New Poster : बॉलिवूड सुपरस्टारअजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी चित्रपट 'रेड-२' ची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय.अगदी अलीकडेच निर्मात्यांनी 'रेड २' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सिनेरसिक सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आय.आर.एस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या १ मे च्या दिवशी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राज कुमार गुप्ता यांनी 'रेड-२' चं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. त्याद्वारे खलनायकाचा भूमिकेवरुन पडदा हटवण्यात आला आहे. 


नुकतीच सोशल  मीडियावर 'टी सिरिझ'च्या सोशल मीडिया अकाऊंटवर आणि रितेश देशमुखच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याद्वारे रितेश देशमुखचा या चित्रपटातील लूक रिव्हिल करण्यात आला आहे. "कानून का मोहताज नहीं, कानून का मालिक है दादा भाई...", असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 
 
२०१८ साली प्रदर्शित झालेला 'रेड' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर जवळपास ७ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत. दरम्यान. या चित्रपटात अजय देवगणबरोबर अभिनेत्री इलियाना डीक्रूज झळकली होती. पण आता 'रेड २' मध्ये इलियानाच्या जागी अभिनेत्री वाणी कपूरची वर्णी लागली आहे. 

Web Title: bollywood actor ajay devgn starrer raid 2 movie new poster out riteish deshmukh will play villain role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.