'बिग बॉस मराठी ६'ची यंदाची थीम काय? समोर आली माहिती, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:40 IST2025-12-21T16:37:46+5:302025-12-21T16:40:49+5:30
मोठी अपडेट! 'बिग बॉस मराठी ६'ची थीम आहे खूपच खास, जाणून घ्या...

'बिग बॉस मराठी ६'ची यंदाची थीम काय? समोर आली माहिती, जाणून घ्या...
Bigg Boss Marathi Season 6 Theme : मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात 'बिग बॉस मराठी'चं बिगुल वाजलंय. आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होईल. 'बिग बॉस मराठी ६'च्या सूत्रसंचालनची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा सांभाळणार आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा झाल्यापासून यंदाची थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अशातच यंदाच्या थीमबद्दल माहिती समोर आली आहे.
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन एका अतिशय भन्नाट आणि आव्हानात्मक 'थीम' मुळे गाजणार आहे. यंदाची थीम ही हिंदी बिग बॉसच्या यशस्वी सीझनवरून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची 'स्वर्ग आणि नरक' अशी थीम असल्याची माहिती समोर येत आहे.
यंदाच्या बिग बॉस घराचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे ते म्हणजे 'महाद्वार'. या महाद्वारातूनच स्पर्धकांचा प्रवेश होणार आहे. या महाद्वारातून आत आल्यावर स्पर्धकांना स्वर्ग आणि नरक अशा दोन वाटांमधून जावे लागेल. यामुळे प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा अधिक ड्रामा आणि मनोरंजन मिळणार हे नक्की झालं आहे.
कधी सुरु होणार?
'बिग बॉस मराठी ६' येत्या ११ जानेवारीपासून सुरु होत असून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल. गेल्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजेता झाला होता. आता यंदा कोणकोणते स्पर्धक घरात प्रवेश करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.