साता जन्माची साथ! 'बिग बॉस' मराठी फेम जय दुधाणे अडकला विवाहबंधनात, पत्नी आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:41 IST2025-12-24T18:38:45+5:302025-12-24T18:41:20+5:30
शुभमंगल सावधान! 'बिग बॉस' मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबेडीत, फोटो आले समोर

साता जन्माची साथ! 'बिग बॉस' मराठी फेम जय दुधाणे अडकला विवाहबंधनात, पत्नी आहे तरी कोण?
Jay Dudhane Married To Harshala Patil: मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अलिकडेच 'बिग बॉस' मराठी फेम सूरज चव्हाण, स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-शंभूराज खुटवड, सोहम बांदेकर- पूजा बिरारी हे लग्नबेडीत अडकले. आता यांच्या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. या अभिनेत्याचं नाव जय दुधाणे आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाणे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

जय दुधाणेने त्याची प्रेयसी हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच जयच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये जय आणि हर्षालाच्या लग्नाची झलक पाहायला मिळते आहे. जय आणि हर्षला यांनी पारंपरिख पोशाख परिधान केला होता. त्यांच्या लग्नाला अभिनेत्री सुरेखा कुडची, प्रविण तरडे तसेच बिग बॉस मधील जयचे स्पर्धकही उपस्थित होते. जय-हर्षलाच्या लग्नाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, जयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही दिसला होता.
कोण आहे पत्नी?
जयच्या पत्नीचं नाव हर्षला पाटील आहे. हर्षला पाटील ही लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणूनही ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकाना डेट करत आहेत.