Video: एकमेकांच्या अंगावर धावून गेले, गळा दाबला अन्...; पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा, ओमकार-विशालमध्ये हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:14 IST2026-01-15T09:13:06+5:302026-01-15T09:14:21+5:30
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील पहिला कॅप्टन्सी टास्क आज पार पडणार आहे. पण, पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Video: एकमेकांच्या अंगावर धावून गेले, गळा दाबला अन्...; पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा, ओमकार-विशालमध्ये हाणामारी
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील पहिला कॅप्टन्सी टास्क आज पार पडणार आहे. पावर की(Power Key) असलेल्या सदस्यांपैकी तन्वी कोलते, प्राजक्ता शुक्रे आणि सोनाली राऊत थेट कॅप्टन्सीच्या उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्यामध्ये आता कॅप्टन्सी टास्क पार पडणार असून यातून घराला पहिला कॅप्टन मिळणार आहे. पण, पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कॅप्टन्सी कार्यादरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू असताना विशाल कोटियन आणि ओमकार राऊत एकमेकांना भिडल्याचं दिसत आहे. ओमकार आणि विशाल यांच्यात कॅप्टन्सी कार्यादरम्यान मोठा राडा झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांच्यात बाचाबाची तर झालीच. पण, त्यानंतर दोघांमध्ये भांडणही झालं. दोघांनीही शक्तीचा वापर करत एकमेकांवर उड्या घेतल्या. विशालने तर ओमकारच्या गळ्यावर हात ठेवल्याचंही दिसत आहे. त्यानंतर आयुष आणि दिव्या दोघांमधील भांडण सोडवताना दिसत आहेत.
कॅप्टन्सी कार्यादरम्यान पहिल्याच आठवड्यात झालेल्या या राड्यामुळे घरातील सदस्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. घरात झालेल्या या वादावर आता बिग बॉस काय अॅक्शन घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखदेखील विशाल आणि ओमकार यांची चांगलीच कानउघाडणी करताना दिसणार आहे.