सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:56 IST2025-11-22T09:48:57+5:302025-11-22T09:56:23+5:30
सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मधील आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाण येत्या काहीच दिवसात लग्नगाठ बांधणार हे आपल्या सर्वांना माहितच आहे. सूरजनंतर बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री म्हणजे पवित्र पुनिया (Pavitra Punia). 'बिग बॉस १४'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पवित्र लवकरच बॉयफ्रेंडसोबत विवाहबंधनातअडकणार असल्याची चर्चा आहे.
रिपोर्ट्सनुसार, पवित्र पुनिया आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता एजाज खान हे दोघे मार्चमध्ये लग्न करणार आहेत. 'बिग बॉस १४'च्या घरात असताना या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं टिकून होतं. याशिवाय अनेक इव्हेंटमध्ये दोघांना स्पॉट करण्यात आलं.
इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, पवित्र आणि एजाज यांनी आपल्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. मार्च महिन्यात त्यांचे लग्न होणार असून, हे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे चाहते त्यांच्याकडून येणाऱ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेत. पवित्र आणि एजाज यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. 'बिग बॉस'च्या घरात त्यांच्यातील केमिस्ट्री खूप चर्चेत होती. आता हे दोघे लवकरच पती-पत्नी म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
पवित्र पुनियाने 'नागिन ३', 'ये हैं मोहब्बतें' आणि 'बालवीर रिटर्न्स' यांसारख्या मालिकांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर एजाज खानने 'काव्यांजली' आणि 'क्या होगा निम्मो का' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.