एवढा कसला राग? अमाल मलिकने फरहानाचं जेवणाचं ताटच फेकलं; आईवरुनही केली वाईट कमेंट
By कोमल खांबे | Updated: October 17, 2025 15:26 IST2025-10-17T15:26:23+5:302025-10-17T15:26:57+5:30
फरहाना डायनिंग टेबलवर जेवत असताना अमालने रागारागात येऊन तिच्या जेवणाचं ताटच फेकून दिलं. यावरुन फरहाना आणि अमालमध्ये नंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

एवढा कसला राग? अमाल मलिकने फरहानाचं जेवणाचं ताटच फेकलं; आईवरुनही केली वाईट कमेंट
Bigg Boss 19: 'बिग बॉस'ने दिवाळीनिमित्त सदस्यांना खास सरप्राइज दिलं. सदस्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना खास पत्र पाठविण्यात आली होती. मात्र यामध्येच कॅप्टन्सी टास्कही होता. सदस्याच्या नावाचं पत्र ज्या स्पर्धकाला मिळेल त्याला ते फाडून स्वत:ला कॅप्टन्सीच्या दावेदारच्या शर्यतीत उतरवता येणार होतं. घरातील काही सदस्यांनी इतर कुटुंबीयांच्या घरून आलेली पत्र न फाडण्याचा निर्णय घेतला. पण फरहानाने मात्र नीलम गिरीच्या घरून आलेलं पत्र फाडून स्वत:च्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत उतरवलं.
फरहानाच्या या निर्णयामुळे संपूर्ण घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. फरहाना विरुद्ध घरातील इतर सदस्य असं चित्र दिसलं. पण, या सगळ्यात अमालने त्याच्या रागाच्या सर्व सीमा पार केला. फरहाना डायनिंग टेबलवर जेवत असताना अमालने रागारागात येऊन तिच्या जेवणाचं ताटच फेकून दिलं. यावरुन फरहाना आणि अमालमध्ये नंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोघांनीही त्यांच्या कुटुंबीयांना यामध्ये ओढलं.
अमालने फरहानाशी बोलताना तिच्या आईवरुन वाईट कमेंट केली. त्यानंतर "तुला सी ग्रेडचेही सिनेमे मिळणार नाहीत. तुला इंडस्ट्रीमध्ये कोणीही विचारणार नाही", असं अमाल म्हणाला. त्यानंतर अमालने फरहानाला तू आणि तुझी आईही बी ग्रेड आहे, अशी कमेंट केली. भडकलेल्या फरहानानेदेखील मग अमालला त्याच्या आई वडिलांवरुन डिवचलं. "तुझे आईवडील आधी एकत्र राहतात का बघ", असं फरहाना अमालला म्हणाली. घरातील सदस्य अमाल आणि फरहानाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. फरहानाला वाईट बोलल्याने अमालला ट्रोल केलं जात आहे. आता 'वीकेंड का वार'मध्ये अमाल आणि फरहानाला सलमान त्याच्या शब्दांत जाब विचारतो का हे पाहावं लागेल.