'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:00 AM2023-10-09T11:00:32+5:302023-10-09T11:01:15+5:30

Singham Again : सध्या रोहित शेट्टी त्याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन'मध्ये व्यग्र आहे, ज्याचे शूटिंग सुरू आहे.

Big news regarding 'Singham Again', Rohit Shetty spent so many crores for the climax | 'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

googlenewsNext

सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याचा आगामी सिनेमा 'सिंघम अगेन' (Singham Again) मध्ये व्यग्र आहे, ज्याचे शूटिंग सुरू आहे. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनीही शूटिंग सुरू केले आहे. रोहित शेट्टी सध्या हैदराबादमध्ये 'सिंघम अगेन'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करत असल्याचं वृत्त आहे, जे खूप दमदार असणार आहे. या क्लायमॅक्सवर दिग्दर्शकाने २५ कोटी रुपये खर्च केले आहेत. अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार 'सिंघम अगेन'मधून पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात सिंबा आणि सूर्यवंशी सिंघमसोबत दिसणार आहेत.

'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, सिंघम अगेनचा क्लायमॅक्स मोठ्या प्रमाणावर शूट केला जात आहे. अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूरही यात दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण देखील या क्लायमॅक्सचा भाग असणार असल्याची चर्चा आहे.

क्लायमॅक्सची ही आहे खासियत

'सिंघम अगेन'च्या क्लायमॅक्स सीक्वन्सबाबत एका अभिनेत्याने महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की चित्रपटाचा क्लायमॅक्स मुख्य चित्रपटापासून वेगळा म्हणून शूट केला जात आहे. म्हणजे चित्रपटाच्या कथेपासून क्लायमॅक्स वेगळा करून वेगळा चित्रपट म्हणून पाहता येईल. 'सिंघम अगेन'च्या क्लायमॅक्सची ही खासियत आहे.


सिंघम अगेनच्या क्लायमॅक्स शूटदरम्यान सर्व स्टार्स आणि क्रू मेंबर्सची अतिरिक्त सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. सूत्रांनी सांगितले की, क्लायमॅक्समध्ये खूपच दमदार अॅक्शन आहे. नुकतेच करीनाने सिंघम अगेनच्या शूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात एक कार उडताना दिसत होती. फोटो शेअर करत करीनाने लिहिले होते की, तिला सांगायची गरज आहे का की, ती कोणत्या सिनेमाचं शूटिंग करते आहे? या पोस्टमध्ये तिने रोहित शेट्टीला टॅग केले होते.  

Web Title: Big news regarding 'Singham Again', Rohit Shetty spent so many crores for the climax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.