अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 12:39 IST2024-05-04T12:38:58+5:302024-05-04T12:39:41+5:30

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट

avinash narkar sangram salvi sun marathi kanyadan serial to go off air actor shared emotional post | अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

अविनाश नारकर यांची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेता म्हणाला, "भरुन आलंय पण..."

टीव्हीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे सन मराठी वाहिनीवरील 'कन्यादान' ही मालिका. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. अडीच वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केल्यानंतर आता 'कन्यादान' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेता संग्राम साळवीने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

'कन्यादान' मालिकेत अभिनेता संग्राम साळवी मुख्य भूमिकेत होता. आता मालिका संपल्यानंतर त्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. "निरोप घेतो आता, तुमची आज्ञा असावी...चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी...!" असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

संग्राम साळवीची भावुक पोस्ट

'कन्यादान' ही आमची मालिका आता तुम्हा रसिकांचा निरोप घेतेय...या मालिकेला तुम्ही मनापासून प्रेम दिलंत त्यासाठी मनापासून आभार..."कन्यादान" विधी जेवढी पवित्र आहे, तेवढंच ही मालिका करताना पावित्र्यतेचा आनंद मला घेता आला...आणि "कन्यादान" झाल्यांनतर आई वडिलांना जेवढं भरून येतं, तसंच काहिसं ही मालिका बंद होताना भरून आलं...पण कुठेतरी थांबावं लागतं...तरंच नवीन सुरुवात होते. तसंच थांबलोय असं समजूया आणि पुन्हा भेटूया एका नव्या भूमिकेसह! त्याच जोमाने, उत्साहाने आणि त्याच आपुलकीने...माझ्या पात्राला “समिर”ला जीव लावलात. हे पात्र साकारताना माझे सहकारी, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि तुम्ही रसिक मायबाप यांचं प्रेम आणि सहकार्य मला लाभलं...पुन्हा एकदा खूप खूप आभार..!!!

'कन्यादान' मालिका २०२१ पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेचा पहिला भाग १७ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. ८२८ भाग प्रसारित झाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत अमृता बने, अविनाश नारकर, संग्राम साळवी, उमा देशमुख, स्मिता हळदणकर अशी स्टारकास्ट होती.

Web Title: avinash narkar sangram salvi sun marathi kanyadan serial to go off air actor shared emotional post