जान्हवी कपूरच्या ड्रेसवरील कमेंटवर भडकला अर्जुन कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 18:18 IST2018-04-12T18:15:54+5:302018-04-12T18:18:10+5:30
जान्हवी कपूरने तिच्या सिनेमाचं शूटिंग सुरु केलंय. तर दुसरीकडे खुशीने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलंय.

जान्हवी कपूरच्या ड्रेसवरील कमेंटवर भडकला अर्जुन कपूर
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला आता दोन महिने होतील. कपूर परिवारातील लोकं कामात बिझी होऊन दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. जान्हवी कपूरने तिच्या सिनेमाचं शूटिंग सुरु केलंय. तर दुसरीकडे खुशीने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलंय.
अशात दोघींनाही भाऊ अर्जुन आणि बहीण अंशुला सपोर्ट करताना दिसत आहेत. वेळोवेळी जान्हवी आणि खुशी अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात असतात. श्रीदेवी यांच्या निधनावेळीही अर्जुन कपूर हा वडील बोनी कपूर आणि बहिणींच्या जवळ दिसला. अर्जुन आपल्या बहिणींची काळजी कशाप्रकारे घेतोय किंवा कसा सपोर्ट करतोय हे नुकतंच बघायला मिळालं.
नुकतेच बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी अर्जुनच्या घरी डिनरसाठी गेले होते. अर्जुन कपूरच्या घरी जेव्हा जान्हवी गाडीतून उतरली. त्यावेळी तिने घातलेल्या ड्रेसचा फोटो एका वेबसाईटने शेअर केला. त्या फोटोवर वेबसाईटने केलेली कमेंट वाचून अर्जुन कपूर भडकला आणि त्याने या कमेंटला प्रत्युत्तर दिलं. त्याच्या उत्तरावरुन तो किती संतापला हे बघायला मिळतं.