अनुष्का शर्माचा फर्स्ट ऑडिशनचा Video होतोय व्हायरल; पहिल्यांदाच दिसली नॉन ग्लॅमरस लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:49 AM2024-05-01T09:49:33+5:302024-05-01T09:49:59+5:30

Anushka sharma: नॉन ग्लॅमरस लूकमध्ये अनुष्का कशी दिसते पाहिलंय का तुम्ही?

anushka-sharma-birthday-actress-audition-video-for-debut-film-and-three-idiots-goes-viral | अनुष्का शर्माचा फर्स्ट ऑडिशनचा Video होतोय व्हायरल; पहिल्यांदाच दिसली नॉन ग्लॅमरस लूकमध्ये

अनुष्का शर्माचा फर्स्ट ऑडिशनचा Video होतोय व्हायरल; पहिल्यांदाच दिसली नॉन ग्लॅमरस लूकमध्ये

कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसतांनाही अनुष्का शर्माने (Anushka sharma) बॉलिवूडमध्ये तिचं  हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अनुष्काचे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. बॉलिवूडच्या ए लिस्ट अभिनेत्रींमध्ये आज अनुष्काचं नाव घेतलं जातं. सध्या अनुष्काचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असते. सोशल मीडियावर अनुष्काचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रचंड वेगळी आणि नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे.

अनुष्का आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तिच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच ऐ दिल हैं मुश्किल फेम अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ एका ऑडिशनचा असल्याचं दिसून येत आहे.

अनुष्का १८ वर्षांची असतांना तिने पहिलं ऑडिशन दिलं होतं. या व्हिडीओमध्ये ती नॉन मेकअप, नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे. परंतु, या सिंपल लूकमध्येही ती कमालीची सुंदर दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत:ला इंट्रोड्यूस करत आहे. ज्यात ती तिचं नाव, जन्मतारीख, उंची आणि मोबाईल सांगत आहे.

यावेळी अनुष्काने डेनिम जीन्स, प्लेन व्हाइट टॉप आणि त्यावर क्रॉप जॅकेट परिधान केलं होतं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जवळपास ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले आहेत.

दरम्यान, अनुष्काने रब ने बना दी जोडी या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. २००८ साली रिलीज झालेल्या या सिनेमात अनुष्काला शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली होती. अनुष्का सध्या दोन मुलांची आई आहे. १५ फेब्रुवारीला तिने अकाय या चिमुकल्या मुलाला जन्म दिला.

Web Title: anushka-sharma-birthday-actress-audition-video-for-debut-film-and-three-idiots-goes-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.