'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:03 AM2023-09-04T10:03:30+5:302023-09-04T10:04:08+5:30

या दोघांसोबत पुन्हा सिनेमा बनवणार नाही असं तो म्हणाला.

anurag kashyap says he cant work with vicky kaushal and nawazuddin siddiqui anymore | 'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

googlenewsNext

'गँग्स ऑफ वासेपूर' सारखे हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही तो आपलं मत मांडत असतो. नुकतंच त्याने विकी कौशल (Vicky Kaushal) आणि नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत (Nawazuddin Siddhiqui)  केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. या दोघांसोबत पुन्हा सिनेमा बनवणार नाही असं तो म्हणाला. तसंच आलिया भटसोबत काम करायची इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे.

अनुराग कश्यप आगामी 'हड्डी' सिनेमात भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,'विकी कौशल, नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्यांना आता सिनेमात घेण्याचं खूप दडपण येतं. कारण त्यांची मार्केट व्हॅल्यू आता वाढली आहे. त्या दोघांची फीस माझ्या बजेटपेक्षा खूपच जास्त आहे. मी त्यांना विचारलं तर ते माझ्यासोबत मोफतही काम करतील. ते कधी मला नाही म्हणणार नाहीत. पण मला याचा दुरुपयोग करायचा नाही.'

तो पुढे म्हणाला, 'भलेही नवाजुद्दीने रमन राघव 2.0 वेळी पैशांची चिंता करु नको असं सांगितलं होतं. तर विकी कौशलने ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत मधील विस्तारित कॅमिओसाठी एक रुपयाही नव्हता घेतला. मी चांगल्या अभिनेत्यांसोबत सिनेमा बनवायला घाबरत नाही मात्र बजेट आणि फीस या गोष्टी बघाव्या लागतात. आज मी विकीसोबत त्याच बजेटमध्ये रमन राघव करु शकत नाही कारण त्याची फीस जास्त आहे. त्याने मोफत सिनेमा केला तरी मला दोषी असल्यासारखं वाटेल. सध्या आलिया भट टॉप अभिनेत्री आहे. माझं तेवढं बजेट असेल आणि गोष्टी जुळून आल्या तर तिच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल.'

Web Title: anurag kashyap says he cant work with vicky kaushal and nawazuddin siddiqui anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.