धक्कादायक! मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगदचा धरणात बुडून मृत्यू....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 10:18 IST2020-12-26T10:17:38+5:302020-12-26T10:18:58+5:30

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, तो मित्रांसोबत बांधावर आंघोळ करायला गेला होता. फार खोलात गेल्याने ते बाहेर येऊ शकले नाही.

Anil Nedumangad died by drowning in Kerala Malankara dam | धक्कादायक! मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगदचा धरणात बुडून मृत्यू....

धक्कादायक! मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगदचा धरणात बुडून मृत्यू....

मल्याळम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अनिल नेदुमंगदचा शुक्रवारी बांधात बुडून मृत्यू झाला. ४८ वर्षीय अनिल केरळच्या इडुक्की जिल्ह्यात होत. तिथे ते मलंकरा धरणावर वर मित्रांसोबत आंघोळ करायला गेले होते. तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, तो मित्रांसोबत धरणावर आंघोळ करायला गेला होता. फार खोलात गेल्याने ते बाहेर येऊ शकले नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ते त्यांच्या आगामी थोडुपुजा सिनेमाचं शूटींग करत होते.

इंडस्ट्रीतील लोकांना त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अनिल नेदुमंगदने अय्यप्पम कोशियुम, परोल, किस्मत आणि कल्याणम सारख्या सिनेमात काम केलं होतं. त्यांनी टीव्ही अॅंकर म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती.

Web Title: Anil Nedumangad died by drowning in Kerala Malankara dam