कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:52 PM2024-05-10T17:52:00+5:302024-05-10T17:52:56+5:30

'कभी हा कभी ना' म्हणत अनन्या आणि आदित्य मध्ये पॅचअप ब्रेकअप सुरु आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

Ananya Pandey Aditya Roy Kapur were spotted together again amidst breakup talks | कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र

कभी हा कभी ना! ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर पुन्हा दिसले एकत्र

बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या जोड्या बनतात आणि कधी कोणत्या तुटतात हे सांगता येत नाही. अनन्या पांडे (Ananya Panday) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) ही अशीच चर्चेतली जोडी. २ वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. वाढदिवसाची पार्टी असो किंवा न्यू इयर सेलीब्रेशन दोघांनी एकत्र अनेक परदेश दौरे केले. त्यांचे परदेशातील फोटोही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच मनोरंजनसृष्टीत त्यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती पसरली. त्यामुळे चाहतेही निराश झाले. पण आता हे लव्हबर्ड्स पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. 

'कभी हा कभी ना' म्हणत अनन्या आणि आदित्य मध्ये पॅचअप ब्रेकअप सुरु आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. ब्रेकअपच्या चर्चांवेळी अनन्या पांडे उदास असल्याचं नेटकऱ्यांनी नोटीस केलं होतं. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला हे सर्वांना जवळपास कन्फर्म झालं. नुकताच दोघांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. भलेही हा व्हिडिओ जाहिरातीचा आहे मात्र त्यात दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे. अफेअरच्या चर्चा सुरु असतानाच त्यांना अनेक जाहिराती मिळाल्या. 

अनन्या आणि आदित्यच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केलाय. 'हे दोघं अजूनही सोबत आहेत', 'दोघांना नजर लागायला नको','तुम्ही लवकर लग्न करा खूप छान दिसता सोबत' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

आदित्य रॉय कपूर काही वर्षांपूर्वी श्रद्धा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तरी आजही चाहत्यांना या दोघांनाही एकत्र पाहायचं आहे. सोशल मीडियावर adishra असं हॅशटॅग अनेकदा ट्रेंडमध्ये असतं. दुसरीकडे  श्रद्धा कपूर लेखक राहुल मोदीला डेट करत आहे,

Web Title: Ananya Pandey Aditya Roy Kapur were spotted together again amidst breakup talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.