Amruta Fadnavis Diwali Spacial Song : दिपावलीनिमित्त अमृता फडणवीस यांचं विशेष गाणं; सोनू निगमचीही साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 12:48 IST2021-10-27T12:48:10+5:302021-10-27T12:48:17+5:30

Amruta Fadnavis New Song : दिपावली निमित्त अमृता फडणवीस आणि सोनू निमग आणणार नवं गाणं.

Amruta Fadnavis Spacial Song on occasion on diwali sonu nigam also there with her | Amruta Fadnavis Diwali Spacial Song : दिपावलीनिमित्त अमृता फडणवीस यांचं विशेष गाणं; सोनू निगमचीही साथ

Amruta Fadnavis Diwali Spacial Song : दिपावलीनिमित्त अमृता फडणवीस यांचं विशेष गाणं; सोनू निगमचीही साथ

ठळक मुद्देदिपावली निमित्त अमृता फडणवीस आणि सोनू निमग आणणार नवं गाणं.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी म्हणून परिचयाच्या आहेत. याशिवाय त्या एक बँकर आणि गायिका म्हणूनही परिचित आहेत. अनेकदा त्या आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सर्वांसमोर येत असतात. आता त्यांनी दिपावलीनिमित्त नवं गाणं आणणार असल्याची माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. दिपावली निमित्त अमृता फडणवीस या एक नवं गाणं घेऊन सर्वांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांना प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचीही साथ लाभणार आहे. दिपावली निमित्त त्या महालक्ष्मीची आरती घेऊन सर्वांच्या भेटीला येणार आहेत.


"महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता! ॐ जय लक्ष्मी माता !,"  असं ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटसह एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये त्या सोनू निगम यांच्यासोबत दिसत आहे. ही आरती अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी स्वरबद्ध केलं असून श्रेयस पुराणिक यांनी हे संगीतबद्ध केलं आहे. अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

Web Title: Amruta Fadnavis Spacial Song on occasion on diwali sonu nigam also there with her