अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:27 IST2025-05-22T16:27:07+5:302025-05-22T16:27:34+5:30

अमिताभ बच्चन KBC च्या पुढील सीझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत अशी चर्चा असून त्यांच्याजागी लोकप्रिय बॉलिवूड सुपरस्टार झळकणार आहे

Amitabh Bachchan left from kbc show salman khan do hosting of kaun banega crorepati | अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार

अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे २००० पासून 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय क्विझ शोचे सूत्रसंचालन करत आहेत. देवीयो और सज्जनो म्हणणारे अमिताभ बच्चन KBC मध्ये त्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने रंगत निर्माण करतात. परंतु KBC आणि विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. KBC शोच्या सूत्रसंचालनाच्या जबाबदारीतून अमिताभ बच्चन आता कायमचे मुक्त होणार आहेत. त्यांच्या जागी बॉलिवूडचा सुपरस्टार त्यांची जागा घेणार आहे. 

हा अभिनेता घेणार बिग बींची जागा

मीडिया रिपोर्टनुसार, वैयक्तिक कारणांमुळे अमिताभ या शोमधून माघार घेण्याचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, सलमान खानची KBC चा नवीन होस्ट म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. सध्या सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांमध्ये आर्थिक अटींवर चर्चा सुरू आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले, तर सलमान खान KBC च्या आगामी सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमिताभ KBC सोडणार याचं चाहत्यांना वाईट वाटलं आहेच पण सलमान त्याच्या दबंग स्टाईलमध्ये अँकरींग कसा करणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

सलमान खानने यापूर्वी 'दस का दम' आणि 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये यशस्वी सूत्रसंचालक म्हणून ओळखले जाते. सलमानचा छोट्या पडद्यावरील अनुभव आणि प्रेक्षकांशी असलेले उत्तम नाते लक्षात घेता KBC साठी तो योग्य पर्याय मानले जात आहेत. अमिताभ बच्चन यांनी मार्च २०२५ मध्ये KBC चा १६वा सीझन संपल्यानंतर पुढील सीझन लवकरच येईल असं सांगितलं होतं. मात्र, आता पुढील सीझनमध्ये अमिताभ नसल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. याआधी एक सीझन शाहरुख खानने KBCचं होस्टिंग केलं होतं. याची अधिकृत घोषणा लवकरच KBC चे मेकर्स करतील,  अशी शक्यता आहे

Web Title: Amitabh Bachchan left from kbc show salman khan do hosting of kaun banega crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.