Sania mirza आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:27 IST2022-11-23T13:26:39+5:302022-11-23T13:27:56+5:30
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचा लवकरच घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु असतानाच 'मिर्झा मलिक' सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sania mirza आधी घटस्फोटाची चर्चा, आता 'मिर्झा मलिक' शोच्या सेटवर सानियाचे फोटोशुट
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचा लवकरच घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु असतानाच त्यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दोघेही मलिक मिर्झा शो मध्ये एकत्रित दिसणार आहेत. त्याचेच फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. आता याच शो च्या सेटवरील सानियाचा सोलो फोटो आला आहे जो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. 'पिंक इज द न्यु ब्लॅक' असे कॅप्शन तिने दिले आहे. सानियाच्या फोटोवर लगेच कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे. हा फोटो मिर्झा मलिक शो चा आहे हे युझर्सनेही बरोबर ओळखले आहे.
पाकिस्तानच्या उर्दुफ्लिक्स या चॅनलवर हा शो प्रसारित होणार आहे. पाकिस्तानी कपल मिनल खान आणि मोहसिन इक्रम या शो मध्ये हजेरी लावणार आहेत. या दोघांचा सोशल मीडियावर एक बुमरॅंग व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
'द मिर्झा मलिक शो' मध्ये सानिया शोएबची जोडी होस्ट करताना दिसणार आहे. या शोच्याच प्रमोशनसाठी घटस्फोटाची अफवा पसरवली तो एक पब्लिसिटी होता अशी चर्चा आता रंगली आहे. पाकिस्तानच्या उर्दुफ्लिक्स या चॅनलवर हा शो प्रसारित होणार आहे.