#PadMan : जेव्हा खिलाडी अक्षय कुमारला विचारण्यात आलं- तू मर्द है न?, ऐका अक्कीचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:57 IST2017-12-25T13:52:56+5:302017-12-25T13:57:09+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी 'पॅड मॅन' सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरला सिनेरसिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे

akshay kumar pad man title song the pad man song video out | #PadMan : जेव्हा खिलाडी अक्षय कुमारला विचारण्यात आलं- तू मर्द है न?, ऐका अक्कीचं सडेतोड उत्तर

#PadMan : जेव्हा खिलाडी अक्षय कुमारला विचारण्यात आलं- तू मर्द है न?, ऐका अक्कीचं सडेतोड उत्तर

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी 'पॅड मॅन' सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरला सिनेरसिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तसंच ''आज से तेरी...'' सिनेमाचं पहिले गाणंदेखील रसिकांना प्रचंड आवडलं आहे. सिनेनिर्मात्यांकडून  सिनेमाचे दुसरे ''द पॅड मॅन'' हे गाणंदेखील रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्यामध्ये पॅड मॅन बनण्यापर्यंतचा प्रवास सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. गाण्यामध्ये शानदार संवाददेखील ऐकायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अक्षय कुमारला विचारतो की, ''तू मर्द हैं न?'' यावर पॅड मॅन उत्तर देतो की, "एक औरत की हिफाजत करने में नाकामयाब इंसान अपने आप को मर्द कैसे कह सकता है."

पॅड मॅनचं टायटल ट्रॅक गायक मिका सिंगनं गायलं आहे. गाण्याला संगीत अमित त्रिवेदीनं दिले आहे, तर गाण्याचे बोल कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत. गाण्यामध्ये तुम्हाला अभिनेत्री सोनम कपूरचा देसी अंदाजदेखील पाहायला मिळेल तर सोबत राधिका आपटेचीही झलक या गाण्यात आहे. 

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या पॅड मॅन या कॉमेडी-ड्रामा सिनेमामध्ये मुख्य भूमिका आहेत. आर.बाल्की हे सिनेमाचे लेखक -दिग्दर्शक आहेत.  हा सिनेमा तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ता अरुणाचलम मुरुगनंतम यांच्या जीवनावर आधारित आहे. 26 जानेवारी 2018 रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 
 

 

 

 

 

Web Title: akshay kumar pad man title song the pad man song video out