संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:57 IST2025-05-30T10:57:02+5:302025-05-30T10:57:38+5:30

दीपिकाची स्पिरीट सिनेमातून हकालपट्टी, ८ तासांच्या शिफ्टची मागणी; अजय देवगण म्हणतो...

ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand | संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडमधली सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांचा रेकॉर्ड पाहता आणि लोकप्रियता पाहता तिचं मानधनही बरंच असतं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दीपिकाने लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर ती आता कामावर परतली आहे. संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' सिनेमात तिची निवड झाली होती. मात्र ८ तासांची शिफ्ट, प्रॉफिटमध्ये सहभाग या मागण्या केल्याने तिची सिनेमातून हकालपट्टी झाली आहे. सध्या वांगा आणि दीपिकामधला वाद बीटाऊनमध्ये चर्चेत आहे. याच वादात अजय देवगणने (Ajay Devgn) उडी घेत त्याचं मत व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री काजोलच्या 'माँ' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अजय देवगणही हजर होता. यावेळी काजोलला आई झालेल्या अभिनेत्रींच्या ८ तासांच्या शिफ्टच्या अटीविषयी विचारण्यात आले. यावर तो म्हणाला,"असं काही नाही की लोकांना ही अट मान्य नसेल. मी तर म्हणेन बऱ्याच प्रामाणिक फिल्ममेकर्सना यामुळे काही अडचण होत नसावी. याशिवाय आई म्हणून कित्येकांनी आधी ८-९ तासांची शिफ्ट सुरु केली आहे. शेवटी हे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे. मला वाटतं इंडस्ट्रीतले बहुतेक लोक हे समजून घेतात." तसंच यावेळी काजोल गंमतीत म्हणाली, "मला तर हे आवडलंय की आम्ही कमी काम करु शकतो."  'मामाराजी' या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


प्रामाणिक फिल्ममेकर्स अभिनेत्रींची ही अट नक्कीच समजून घेतात असं तो स्पष्ट म्हणाला आहे. अजय देवगणच्या या वक्तव्यानंतर त्याचा रोख संदीप रेड्डी वांगाकडेच होता का अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान वांगा यांनी 'स्पिरीट' सिनेमात दीपिकाच्या  जागी आता तृप्ती डिमरीची निवड केली आहे. या सिनेमासाठी तृप्ती १० कोटी घेणार आहे. तर दीपिकाने याच सिनेमासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती ज्याची खूप चर्चा झाली. 

Web Title: ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.