प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड फोटो, श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडने केलं फोटोशूट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:32 IST2025-05-23T16:31:52+5:302025-05-23T16:32:48+5:30
अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड फोटो, श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडने केलं फोटोशूट; म्हणाली...
अभिनेत्री तारा सुतारियाने (Tara Sutaria) आपल्या बोल्ड फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला टॉपलेस फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्रीच्या बोल्डनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केवळ पांढऱ्या पडद्याने शरीर झाकलेलं असून तिने आपली कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केली आहे. तारा सुतारियाचा हा फोटो क्लिक करणारा श्रद्धा कपूरचा एक्स बॉयफ्रेंड आहे.
आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री तारा सुतारिया अनेकदा चर्चेत असते. तिने एकदम हॉट फोटोशूट केलं आहे ज्यात तिच्या अंगावर पडदा गुंडाळलेला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट पाठमोरा फोटो असून त्यात तिने आपली फिगर फ्लॉन्ट केली आहे. २९ वर्षीय अभिनेत्रीचा कॉन्फिडन्स आणि बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चाहते तर तिच्यावर भाळले आहेत. 'माझा डार्लिंग मित्र रोहन श्रेष्ठासोबत निवांत दुपार...घरातच आम्ही हा प्रयोग केला. एकदम ९० च्या दशकात गेल्यासारखं वाटलं." असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.
तारा सुतारियाचं हे फोटोशूट श्रद्धा कपूरचा एक्स बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाने केलं आहे. रोहन हा प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. अनेक कलाकारांचं त्याने फोटोशूट केलं आहे. तारा सुतारिया आगामी 'टॉक्झिक' सिनेमात दिसणार आहे. ताराचे हे फोटो पाहून लोकांनी रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंशी तुलना केली आहे. तर काहींनी ताराच्या बोल्डनेसचं कौतुक केलं आहे.