कुर्यात सदा मंगलम! नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला अडकले लग्नबंधनात; विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:23 IST2024-12-05T08:22:06+5:302024-12-05T08:23:16+5:30
नागा चैतन्य-शोभिता धुलीपाला यांनी काल लग्न केलं असून दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत.

कुर्यात सदा मंगलम! नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला अडकले लग्नबंधनात; विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो व्हायरल
गेल्या अनेक महिन्यांपासून ज्यांच्या लग्नाची सर्वांना आतुरता होती ती जोडी म्हणजे नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला. अखेर या दोघांनी काल रात्री (४ डिसेंबर) ८.१५ च्या मुहुर्तावर एकमेकांशी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पारंपरिक थाटात दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. (naga chaitanya - sobhita dhulipala wedding)
नागा चैतन्य-शोभिता धुलीपालाचा विवाहसोहळा
लग्नसोहळ्यात नागा अन् शोभिताने पारंपरिक साज परिधान केला होता. शोभिता साउथ इंडियन साडीत खूप सुंदर दिसत होती. तिने गोल्डन रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. त्यासोबत साजेसा दागिन्यांचा श्रृंगार केला होता. केसात फुलांची सजावट केल्याने नववधू शोभिताला आणखी सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे नागा चैतन्यने पांढरा कुर्ता परिधान केला होता. दोघांच्या लूकला चाहत्यांनी पसंती दिली असून त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
समांथाशी घटस्फोट घेतल्यावर नागा चैतन्यचं दुसरं लग्न
नागा चैतन्यचं याआधी सुप्रसिद्ध अभिनेत्री समांथासोबत लग्न झालेलं. परंतु लग्नानंतर काही वर्षांनी २०२२ ला या दोघांनी घटस्फोट घेतला. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यांनी नागा आणि शोभिता यांचं अफेअर सुरु झालं. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सोशल मीडियावर जोरात होती. काही दिवसांपासून शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या लग्नापूर्वीच्या विधींच्या सुंदर फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली. अखेर काल ४ डिसेंबरला दोघांनी लग्न केलं.