घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणार ४० वर्षीय अभिनेत्री? नववर्षाच्या सुरुवातीलाच बॉयफ्रेंडसोबत फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:48 IST2026-01-02T12:48:24+5:302026-01-02T12:48:58+5:30
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली

घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणार ४० वर्षीय अभिनेत्री? नववर्षाच्या सुरुवातीलाच बॉयफ्रेंडसोबत फोटो
गेल्या वर्षी २०२५ मध्ये मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. कोणी लग्न केलं तर कोणाला मूल झालं. आता २०२६ नववर्षाच्या सुरुवातीला ४० वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं आहे. बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली. कोण आहे ही अभिनेत्री?
'लिपस्टिक अंडर माय बुर्का', 'फोर मोर शॉट्स', 'पिंक'मध्ये दिसलेली अभिनेत्री आहे कीर्ती कुल्हारी. कीर्तीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. राजीव सिद्धार्थसोबत तिचा हा व्हिडीओ आहे. गेल्या काही काळापासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 'एक फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा...सगळ्यांना हॅपी २०२६ ."
सिद्धार्थ आणि कीर्ती दोघंही 'फोर मोर शॉट्स' मध्ये दिसले होते. त्यांची सहकलाकार मानवी गांगरुनेही कमेंट करत दोघांचं अभिनंदन केलं आहे. 'अंजना आणि मिहिर इन पॅरालल युनिव्हर्स' अशी कमेंट चाहत्यांनी लिहिली आहे.
कीर्ती कुल्हारीने २०१६ साली अभिनेता साहिल सहगलसोबत लग्न केलं होतं. आपापसातील मतभेदांमुळे २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हा कीर्तीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली होती.