१६ वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह 'थलाइवी' सिनेमात झळकणार कंगना रानौत, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:28 PM2021-03-25T15:28:30+5:302021-03-25T15:29:50+5:30

Actor Arvind Swami has earlier too has appeared in films.अरविंद स्वामीने यापूर्वी 'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकल आहे.

Actor Arvind Swami to feature along with Kangana Ranaut in 'Thalaivi', Read to know his special skills... | १६ वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह 'थलाइवी' सिनेमात झळकणार कंगना रानौत, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी.

१६ वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्यासह 'थलाइवी' सिनेमात झळकणार कंगना रानौत, जाणून घ्या त्याच्या या खास गोष्टी.

googlenewsNext

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना सध्या तिच्या आगामी ‘थलयवी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  ट्रेलरही रिलीज करण्यात आला. जयललिता यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या सिनेमात कंगणा मुख्य भूमिकेत आहे. जयललिता यांच्या लूकप्रमाणेच कंगणाचे सिनेमात लूक असणार आहे. विविध टप्प्यातील जयललिता यांच्या लूक सारखेच कंगणाचे लूक वेळोवेळी चाहत्यांसह शेअर करण्यात आले होते. जयललिता यांच्या रूपात कंगणाला तुफान पसंती मिळाली. जयललिता यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती होती  एमजीआर. 


सिनेमात एमजीआर यांची भूमिका साकारत आहेत अभिनेता अरविंद स्वामी. या लूकमध्ये अरविंद स्वामीला ओळखणे देखील कठीण जात आहे. अरविंद स्वामीने कित्येक किलो वजन कमी केले असून तो या लूकमध्ये खूपच वेगळा दिसत आहे.अरविंद स्वामीने यापूर्वी 'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकल आहे. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होता.पण 'डिअर डॅड' या सिनेमाद्वारे 2016 मध्ये अभिनयक्षेत्रात कमबॅक केले होते. एमजीआरच्या थलाईवीमधील भूमिकेत अरविंदला ओळखणे फारच कठीण आहे.

अरविंद स्वामी तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांचा स्टार आला तरीही, हिंदी सिनेमातही तो झळकला आहे. पण हिंदी सिनेमात अरविंदला हवे तसे यश मिळाले नाही.

1991 मध्ये मणिरत्नम यांचा थलपथी सिनेमातून अरविंदने एक्टिंग जगतात पाऊल ठेवले होते.या नंतर 1992 मध्ये अभिनेत्री मधूसह  'रोजा' सिनेमातही झळकले होता. रोजा सिनेमाने त्याच्या करिअरला वेगळे वळण मिळाले.

आता थलयवी सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमात एमजीआरच्या भूमिकेतून अरविंदचे हे कमबॅक कितपत रसिकांचे मनोरंजन करणार हे पाहणे रंजक असणार आहे.

Web Title: Actor Arvind Swami to feature along with Kangana Ranaut in 'Thalaivi', Read to know his special skills...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.