दिवाळीचे फटाके फोडताना अभिनेत्रीसोबत अपघात; Video शेयर करत म्हणाली - वाचलो, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:58 IST2021-11-05T15:51:41+5:302021-11-05T15:58:42+5:30
राणीने सुरसुरीच्या सहाय्याने अनार पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तो फुटला आणि प्रचंड धूर तयार झाला. हा व्हिडिओ राणीने शेअर केला आहे.

दिवाळीचे फटाके फोडताना अभिनेत्रीसोबत अपघात; Video शेयर करत म्हणाली - वाचलो, पण...
देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. केवळ सामान्य लोकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रीही या उत्सवाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीनेही (Bhojpuri Actress Rani Chatterjee) गुरुवारी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली आणि फटाकेही उडवले. मात्र, याचवेळी तिच्या सोबत एक अपघातही घडला. ती एक फटाका पेटवत असतानाच तो अचानक फुटला. सुदैवाने, यात अभिनेत्रीला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. राणीने (Actress Rani Chatterjee Video Viral) स्वतःच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.
फटाके पेटवताना राणीसोबत घडला अपघात -
अभिनेत्री राणी चटर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती अनार (फटाक्याचा एक प्रकार) पेटवताना दिसत आहे. राणीने सुरसुरीच्या सहाय्याने अनार पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तो फुटला आणि प्रचंड धूर तयार झाला. हा व्हिडिओ शेअर करताना राणीने लिहिले आहे, की "काल असे घडले. मी आणि सॅमी तर वाचलो, पण मित्रांनो कृपया सुरक्षित रहा."
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल -
भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी सोशल मीडिया अकाउंटवर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. राणीने तिचा हा व्हिडिओ इन्स्टावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अवघ्या काही तासांत या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. एवढेच नाही, तर शुक्रवारी दुपारपर्यंत हा व्हिडिओवर दीडशेहून अधिक कमेंट्स देखील आल्या होत्या.