आमिर खानच्या लेकाचा हटके अंदाज! खुशी कपूरसोबत जुनैद खानचं नवं गाणं चर्चेत, आताच पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:20 IST2025-01-03T15:20:02+5:302025-01-03T15:20:36+5:30
आमिर खानचा लेक जुनैद खानच्या नव्या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय

आमिर खानच्या लेकाचा हटके अंदाज! खुशी कपूरसोबत जुनैद खानचं नवं गाणं चर्चेत, आताच पाहा
आमिर खानचा लेक जुनैद खानने गेल्या वर्षी २०२४ मध्ये 'महाराज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आला. जुनैदच्या अभिनयाची आणि अभिनयातील खरेपणाची चांगलीच तारीफ झाली. जुनैद खानचा नवीन वर्षातील पहिला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतोय. या सिनेमात जुनैदसोबत अभिनेत्री खुशी कपूर झळकणार आहे. 'लव्हयापा' असं या सिनेमाचं नाव असून सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यात जुनैद आणि खुशीचा एकदम हटके अंदाज बघायला मिळतोय.
जुनैद-खुशीच्या गाण्याची चर्चा
'लव्हयापा' सिनेमातील जुनैद-खुशीच्या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. 'लव्हयापा' सिनेमाचं टायटल ट्रॅक असून जुनैद-खुशीच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलंय. जुनैद 'महाराज' सिनेमात ज्या साध्या-सोज्वळ भूमिकेत दिसला होता तोच 'लव्हयापा'मध्ये मस्तीखोर अंदाजात झळकणार आहे. दुसरीकडे खुशीने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने आणि अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. हे गाणं रिलीज होताच अल्पावधीत ते सोशल मीडियावर ट्रेंंडिंग झालंय.
'लव्हयापा' कधी रिलीज होणार?
दरम्यान, मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी फँटम स्टुडिओद्वारे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. "सिच्युएशनशिप की रिलेशनशिप? लव्ह का सियाप्पा की लव्हयापा?" असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं होतं. येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ ला हा सिनेमा थिएटमध्ये सर्वांना पाहता येईल. जुनैद-खुशीच्या या नव्या सिनेमाची तरुणाईमध्ये क्रेझ आहे.