आमिरच्या लेकाच्या सिनेमाचं स्क्रीनिंग, सलमान-शाहरुखच्या उपस्थितीने लावले चार चाँद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:12 IST2025-02-06T09:12:05+5:302025-02-06T09:12:31+5:30
सलमानच्या जीन्सवर लिहिलाय मजेशीर मेसेज

आमिरच्या लेकाच्या सिनेमाचं स्क्रीनिंग, सलमान-शाहरुखच्या उपस्थितीने लावले चार चाँद
अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खानचा 'लव्हयापा' सिनेमा उद्या रिलीज होत आहे. काल आमिरने लेकाच्या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. यामध्ये त्याने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना बोलवलं होतं. यावेळी शाहरुख (Shahrukh Khan) आणि सलमान (Salman Khan) हे दोन्ही खानही सहभागी झाले. आमिरचे शाहरुख आणि सलमानसोबतचे फोटो, व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात तीन खान एकत्र आले होते. त्यानंतर आता काल जुनैद खान आणि खुशी कपूरच्या 'लव्हयापा' स्क्रीनिंगसाठी त्यांना एकत्र पाहिलं गेलं. मात्र शाहरुख आणि सलमान वेगवेगळ्या वेळी आल्याने तिघं एकत्र फ्रेममध्ये दिसले नाहीत. ब्लू शर्ट, जीन्स या लूकमध्ये शाहरुख खानने डॅशिंग एन्ट्री मारली. तो कारमधून उतरताच आमिर आला आणि दोघांनी गळाभेट घेतली. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. जुनैदही नंतर त्यांच्यात जॉइन झाला.
तर दुसरीकडे कडक सुरक्षाव्यवस्थेसह सलमान खानही स्क्रीनिंगला आला होता. ग्रीन शर्ट, ब्लू जीन्स या लूकमध्ये तो आला. त्याच्या जीन्सवर मजेशीर मेसेजही लिहिला होता. 'लव्ह नाऊ, क्राय लेटर' असं जीन्सवर लिहिलेलं दिसलं. आमिर आणि सलमाननेही पापाराझींना पोज दिली.
'लव्हयापा' ची स्क्रीनिंग एकदम स्टारस्टडेड होती. जान्हवी कपूरही बहिणीसाठी आली होती. सिनेमात जुनैद आणि खुशीची फ्रेश जोडी बघायला मिळत आहे. उद्या ७ फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे.