देवी तुळजाभवानीला भवानी शंकरांची खरी ओळख पटणार का? 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:43 IST2025-01-22T16:42:25+5:302025-01-22T16:43:50+5:30

कलर्स मराठी वाहिनीवरील‘आई तुळजाभवानी’ ही मालिका रंजक वळणावर आहे.

aai tuljabhavani serial update will tulja bhavani recognise bhavani shankar | देवी तुळजाभवानीला भवानी शंकरांची खरी ओळख पटणार का? 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंजक वळण

देवी तुळजाभवानीला भवानी शंकरांची खरी ओळख पटणार का? 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंजक वळण

कलर्स मराठी वाहिनीवरील‘आई तुळजाभवानी’ ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत अनेक घटना घडत असतानाच देवीने शाकंभरी देवीच्या रुपात दर्शन दिले आणि सृष्टीचे महत्त्व सांगितले. तर दुसरीकडे, देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत. देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या शेवटी तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे-फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज-गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का? हा रंजक कथाभाग उलगडत आहे. 

देवींची कन्या अशोकसुंदरीला आलेला भवानीशंकराबद्दलचा संशय वाढू लागला आहे. पण, महादेवांना देखील आई तुळजाभवानीसमोर खऱ्या रुपात येण्याची आतुरता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे शृंगीचे पृथ्वीवर आगमन झाल्यावर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण, श्रुंगी महाराजांचं असं अचानक पृथ्वीवर येण्याचे नेमके कारण काय असेल ? याचा खुलासा हळूहळू होईलच. भैरवाला देवीने अढळ स्थान शोधण्याची दिलेल्या जबाबदारीत अध्येमध्ये जाणवणारे शिवतत्व यामुळे देवीचा संशय बळावला असून देवींना सत्य समजल्यावर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, त्यांच्या रागात भर पडेल ? की कुटुंब एकत्र आल्याचा आनंद असेल? हा अत्यंत उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास  येत्या शनिवार २५ जानेवारी पर्यंतच्या आई तुळजाभवानीच्या भागात दिसणार आहे. 

मानवीरूपात देवांना ही भोगांना सामोरे जावे लागणे हा कथेचा विषय जितका अनोखा तितकाच आदिशक्तीच्या या रचनेपाठची लीला ही आवर्जून जाणून घेण्यासारखी आहे. तेव्हा मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: aai tuljabhavani serial update will tulja bhavani recognise bhavani shankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.