१२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर; श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:58 IST2025-01-17T10:33:04+5:302025-01-17T12:58:32+5:30

विश्वविक्रमी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकात नायकाच्या रूपात बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनी भूषण मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

12 Marathi films premiere in 12 months; Activities at Shri Shivaji Mandir Theatre | १२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर; श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात उपक्रम

१२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर; श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात उपक्रम

मुंबई : मागील काही दिवसांपासून नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. अशातच ‘अलबत्या गलबत्या’ फेम अभिनेता सनीभूषण मुणगेकरने श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात १२ महिने १२ आगामी मराठी चित्रपटांचा प्रीमियर करण्याचे निश्चित केले अहे. ‘टेक इट इझी उर्वशी’ या चित्रपटाच्या प्रीमियरने या अनोख्या उपक्रमाची गुरुवारी सुरुवात करण्यात आली.

विश्वविक्रमी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकात नायकाच्या रूपात बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनी भूषण मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘टेक ईट इझी उर्वशी’च्या प्रीमियरसह यंदा १२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा सनीचा मानस आहे.

लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशी चतुरस्र कामगिरी करणारा सनी म्हणाला की, आजवर मुंबईतील नाट्यगृहात चित्रपटाचा प्रीमियर झालेला नाही. नाटकांचे प्रयोग शनिवारी-रविवारी असल्याने सोमवार ते शुक्रवारी इथे चित्रपट दाखवले जाऊ शकतात. मागच्या वर्षी तयार केलेल्या १२ चित्रपटांचे १२ प्रीमियर नाट्यगृहात करणार आहे. 

विनोदाच्या विविध छटा...
विविध विषयांवरील १२ चित्रपटांमध्ये ब्लॅक, सस्पेन्स, रोमँटिक, स्लॅपस्टिक, हॅारर, साय-फाय, नॅचरल अशा कॉमेडीच्या विविध छटा आहेत. यात ‘टेक इट इझी उर्वशी’, ‘सोलोमन आयलँड’, ‘वारसदार’, ‘जाेडीचा मामला’, ‘अपना टाइम आएगा’, ‘अपना टाइम आएगा २’, ‘अपना टाइम आएगा ३’, ‘एसएमएस-श्रीरंग मनोहर सूर्यवंशी’, ‘गण्या धाव रे’, ‘आले पंटर’, ‘आले पंटर रिटर्न्स’, ‘आले पंटर अगेन’ यांचा समावेश 

बजेटच्या जाळ्यात न अडकता कौटुंबिक चित्रपट
हरेश ठक्कर निर्मित ‘उर्वशी’चे दिग्दर्शन सनी भूषणने निखिल कटारेच्या साथीने दिग्दर्शन केले आहे. 
कथा, पटकथा, संवाद सनी आणि महेश शिंदे यांचे आहेत. सनीसोबत नूतन जयंत, सूचित जाधव, आनंदा कारेकर, हर्षदा पिलवलकर, दीपश्री भारत कवळे, सनीभूषण प्रमोद मुणगेकर आणि जनार्दन लवंगारे यांच्यासोबत रंगभूमीवरील नवोदित कलाकार आहेत.  
‘टेक इट इझी उर्वशी’ हा पहिला चित्रपट आहे. विषयाला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवल्याने बजेटच्या जाळ्यात न अडकता कौटुंबिक मनोरंजक चित्रपट बनवणे शक्य झाल्याचेही भूषण याने सांगितले.

Web Title: 12 Marathi films premiere in 12 months; Activities at Shri Shivaji Mandir Theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.