Fact Check: पोलिसांच्या लाठीचार्जच्या 'या' व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही; सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:03 PM2024-05-22T14:03:29+5:302024-05-22T14:11:32+5:30

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतं आहेत.

fact check news This video of police baton charge has nothing to do with Lok Sabha elections Know the truth | Fact Check: पोलिसांच्या लाठीचार्जच्या 'या' व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही; सत्य जाणून घ्या

Fact Check: पोलिसांच्या लाठीचार्जच्या 'या' व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही; सत्य जाणून घ्या

Claim Review : Fact Crescendo
Claimed By : Facebook
Fact Check : चूक

Created By: Fact Crescendo
Translated By: ऑनलाइन लोकमत

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलीस लोकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

कानपूर देहाटशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस एका व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. तरुणाच्या मांडीवर एक मूल जोरात ओरडत आहे. व्हिडिओमध्ये तो सर मला मारू नका, मुलाला दुखापत होईल, असे म्हणताना ऐकू येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, कानपूरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान मांडीवर मुलगा असलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओसोबत एका युजरने लिहिले की, कानपूर, सर, मुलाला लागेल. पोलिसांकडून मारहाण होत असताना ही व्यक्ती ओरडत राहिली, मात्र खाकीच्या नशेत असलेल्या या पोलिसांनी त्याचे ऐकले नाही. मुलाला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकसभा निवडणूक 2024.

फेसबुकआर्काइव 

रिसर्च केल्यानंतर समजले की....

तपासाच्या सुरुवातीला, व्हायरल व्हिडिओबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळे कीवर्ड शोधण्यास सुरुवात केली. परिणामी, आम्हाला एनडीटीव्ही (आर्काइव) च्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओची बातमी सापडली. या बातमीत व्हायरल झालेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट वापरण्यात आला आहे. छायाचित्रासह ही बातमी 10 डिसेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आली आहे.


 

प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर गावात घडली. अकबरपूरच्या सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. लाठीचार्जच्या व्हायरल व्हिडिओमध्ये संपाचे नेतृत्व करणाऱ्या रजनीश शुक्ला यांचा भाऊ पुनीत शुक्ला यांनाही मारहाण करण्यात आली आहे. पुनीत यांनी त्यांचा भाऊ रजनीशची तीन वर्षांची मुलगीही आपल्या मांडीवर घेतली होती. पोलिसांनी रजनीशला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी पुनीत शुक्ला यांनाही लाठीमार करण्यास सुरुवात केली.

ही बातमी इथे बघता येईल

पुढील तपासात आम्हाला कानपूर झोनचे एडीजी भानू भास्कर यांचे ट्विट सापडले. यात त्यांनी नंतर ट्विट करून माहिती दिली होती. 'व्हिडिओमध्ये काठी चालवताना दिसणारा पोलीस निरीक्षक सध्या निलंबित करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार, अकबरपूर भागातील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या रजनीश शुक्ला या वर्ग चौथ्या कर्मचाऱ्याने १०० ते १५० लोकांसह रुग्णालयात अराजकता पसरवली होती. या लोकांनी रुग्णालयाची ओपीडी बंद करून रुग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बळाचा वापर करून आंदोलकांवर कारवाई केली होती.
 

निष्कर्ष- वस्तुस्थिती तपासल्यानंतर आम्हाला असे आढळून आले की, पोलिसांच्या लाठीचार्जच्या या व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ 2021 मध्ये कानपूर देहाट येथील रुग्णालयाबाहेर आंदोलकांवर पोलिसांच्या कारवाईचा आहे.

(सदर फॅक्ट चेक Fact Crescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check news This video of police baton charge has nothing to do with Lok Sabha elections Know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.