‘तो अधिक परिपक्व झालाय’; श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन आणि अर्शदीपसाठी Preity Zinta चा खास मेसेज

वानखेडेच्या मैदानात PBKS चे दोन सह मालक दिसले, मालकीण 'गायब'; पण...

पंजाब किंग्सच्या संघाने वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सला एकहाती पराभूत करत दिमाखदार विजय नोंदवला. पंजाब फ्रँचायझी संघाचे सह-मालक मोहित बर्मन आणि नेस वाडिया ही जोडी संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहचली होती.

IPL मधील पंजाब किंग्सच्या बहुतांश सामन्या दरम्यान प्रितीची 'ब्युटी ऑन ड्युटी' झलक पाहायला मिळते. पण मुबंई इंडियन्सविरुद्धच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यात प्रीती झिंटा ची झलक काही दिसली नाही.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याला ती का नाही आली? अशी चर्चा रंगत असताना तिने खास पोस्ट शेअर करत संघासह कर्णधार श्रेयस अय्यर आणि सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगसह प्रभसिमरनसाठी शेअर केलेली खास पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

जरी ती स्टेडियमवर उपस्थितीत नसली तरी तिने आपल्या घरीच टेलिव्हिजनवर सामन्याचा आनंद घेतला. एवढेच नाही तर खास फोटो शेअर करत तिने पंजाब किंग्सच्या 'नंबर वन कामगिरी'मुळे 'आनंदी आनंद गडे...' मोहोल असल्याचे दाखवून दिले.

PBKS संघाला चीअर करण्यासाठी ज्या ज्या वेळी ती मैदानात उपस्थितीत असते त्या त्या वेळी मैदानात ती सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूसोबत सेल्फी घेताना पाहायला मिळाले आहे.

अर्शदीप सिंग सर्वाधिक ३ विकेट्स घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याच्यासाठी प्रीतीनं लिहिलंय की, तुझी चमकदार कामगिरी पाहून छान वाटलं. मागील चार सामन्यात तो विकेट लेस राहिला होता. प्रीतीनं शेअर केलेल्या या फोटोत मॅचच्या हिरोला पिक्चरमध्ये घेत तिने खास सेल्फी क्लिक केल्याचे दिसून येते.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अनकॅप्ड सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने ८० धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या खेळीवरही प्रीती फिदा झाली आहे. तो अधिक परिपक्व झाल्याचे दिसते, असा खास उल्लेख तिने आपल्या खास पोस्टमध्ये केला आहे.

प्रीती झिंटाने 'सरपंच' श्रेयस अय्यरच्या नेतृत्वासह त्याने हार्दिक पांड्याच्या खेळीला ब्रेक लावण्यासाठी जो सुपरमॅन अवतार दाखवला त्याचा खास उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे.