बहुचर्चित आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यासाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. पण संघ घोषणेपूर्वी सर्वात मोठा प्रश्न हा संघाच्या कर्णधाराबद्दल आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिटनेसच्या समस्येमुळे दुलीप ट्रॉफीमधून आपले नाव मागे घेतले आहे. सध्या तो NCAमध्ये पुनर्वसन करत आहे. परंतु त्याचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फिटनेसबाबत पुष्टी करता येणार नाही.
टी२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादव हा केवळ टीम इंडियाचा कर्णधार तर आहेच, पण फलंदाजीची मोठी ताकद आहे. अशा परिस्थितीत, सूर्यकुमारची जागा घेण्यासाठी तीन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलला आशिया कपसाठी टी२०चा कर्णधार केले जाऊ शकते. तो संघात आला आणि वरच्या फळीतील सूर्यकुमारच्या फलंदाजीची जागा भरून निघू शकेल.
आशिया कपसाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला चांगला कर्णधार मिळू शकतो. तसेच, चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाजही मिळू शकतो.
सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत अनुभवी अक्षर पटेलचा पर्यायही चर्चेत आहे. अक्षर पटेल टी२०मध्ये उपकर्णधार आहे. त्याला टी२० फॉरमॅटचा बराच अनुभव असून, तो प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे.