WPL 2026 : लेडी सेहवाग 'नॉट रिचेबल'! विकेटमागे रिचानं दाखवली चपळाई, ड्रेसिंग रुममधून पांड्यानंही दिली दाद (VIDEO)

रिचाची चपळाई अन् लेडी सेहवागवर आली 'नॉट रिचेबल'ची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 23:07 IST2026-01-24T23:02:21+5:302026-01-24T23:07:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
WPL 2026 Brilliant Works With Gloves By Richa Ghosh Shafali Verma Wicket Sayali Satghare Krunal Pandya Viral Video | WPL 2026 : लेडी सेहवाग 'नॉट रिचेबल'! विकेटमागे रिचानं दाखवली चपळाई, ड्रेसिंग रुममधून पांड्यानंही दिली दाद (VIDEO)

WPL 2026 : लेडी सेहवाग 'नॉट रिचेबल'! विकेटमागे रिचानं दाखवली चपळाई, ड्रेसिंग रुममधून पांड्यानंही दिली दाद (VIDEO)

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील १५ व्या सामन्यात स्मृती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध जेमिमा रॉड्रिग्जचा दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना खेळवण्यात आला. दोन जीवलग मैत्रीणींच्यातील लढतीत धावांचा पाठलाग करताना जेमिमाच्या संघाने सामना जिंकत या स्पर्धेतील आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. दुसरीकडे स्मृतीच्या संघाला पाच सामन्यानंतर यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. RCB च्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्व विकेट्स गमावत १०९ धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर ११० धावांचे टार्गेट सेट केले होते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रिचाची चपळाई अन् लेडी सेहवागवर आली 'नॉट रिचेबल'ची वेळ
 
या धावसंख्येचा पाठलाग करताना  लेडी सेहवाग नावाने ओळखली जाणाऱ्या शेफालीनं दिल्ली कॅपिटल्सच्या दमदार सुरुवात करून दिली. दिल्लीच्या डावातील दुसऱ्या षटकात  शेफाली वर्मा ८ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने १६ धावांवर खेळत होती. या षटकात सायली सतघरे हिने स्टार बॅटरला चकवा दिला अन् विकेटमागे रिचा घोषनं डोळ्याची पापणी लवण्याआधी बेल्स उडवत शेफालीच्या खेळीला ब्रेक लावला. WPL मध्ये सातत्याने रिचा घोष विकेटमागे दमदार कामगिरीनं लक्षवेधून घेत आहे. यावेळी तिच्या चपळाईसमोर लेडी सेहवाग नॉट रिचेबल ठरली अन् तिला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. 

WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर

ड्रेसिंग रुममधून पांड्यानंही दिली दाद

स्मृतीच्या संघाला चीअर करण्यासाठी आरसीबी पुरुष संघातील प्रमुख खेळाडू क्रुणाल पांड्याही वडोदराच्या स्टेडियमवर उपस्थितीत होता. रिचाच्या यष्टीमागील जबरदस्त कामगिरीनंतर कॅमेरा त्याच्याकडे फिरला. यावेळी तो टाळ्या वाजवून रिचा आणि सायली सतघरे या दोघींना दाद देताना दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

दिल्लीच्या दोन्ही सलामीच्या बॅटरर्सची सायलीनं घेतली विकेट, पण...

अल्प धावसंख्येचा बचाव करताना सायली सतघरे हिने ३ षटकात १८ धावा खर्च करत शेफाली वर्मासह लीझेल लीच्या रुपात दोन विकेट्स घेतल्या. राधा यादवनं जेमिमा रॉड्रिग्जला २४ धावांवर बाद खेले. पण त्यानंत लॉरानं आपला तोरा दाखवला. तिने ३८ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने दिल्लीच्या विजयाचा मार्ग सुकर केला.  मेरिझॅन कॅप (Marizanne Kapp)हिने १५ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने नाबाद १० धावा केल्या. या दोघींनी १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ७ विकेट्स राखून संघाचा विजय निश्चित केला.

 

Web Title : लेडी सहवाग 'नॉट रीचेबल'! रिचा की चपलता, पांड्या ने सराहा।

Web Summary : डब्ल्यूपीएल में, दिल्ली कैपिटल्स ने रॉयल चैलेंजर्स बैंगलोर को हराया। रिचा घोष की त्वरित स्टंपिंग ने शेफाली वर्मा को आउट किया। हार्दिक पांड्या ने स्टैंड से देखा और प्रभावशाली खेल की सराहना की। दिल्ली 7 विकेट से जीता।

Web Title : Lady Sehwag 'Not Reachable'! Richa's brilliance, Pandya applauds in WPL.

Web Summary : In WPL, Delhi Capitals beat Royal Challengers Bangalore. Richa Ghosh's quick stumping dismissed Shafali Verma. Hardik Pandya, watching from the stands, applauded the impressive play. Delhi won by 7 wickets.