WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर

MI नं कुणाच्या जागेवर अन् किती रुपयांसह तिला आपल्या संघात सामील करुन घेतले? जाणून घ्या सविस्तर

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली असताना मेगा लिलावात निराशा पदरी आलेल्या वैष्णवी शर्माच नशीब चमकले आहे.

WPL च्या मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग लागलेल्या वैष्णवी शर्माची मुंबई इंडियन्सच्या संघात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे टीम इंडियातील ही सुंदरी चर्चेत आली आहे.

डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या वैष्णवी शर्माला WPL लिलावात पाच पैकी एकाही फ्रँचायझी संघाने भाव दिला नव्हता. पण हे अपयशानंतर तिला टीम इंडियाची लॉटरी लागली.

घरच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघातून तिने पदार्पण केले.

पदार्पणाच्या पहिल्या लढतीत विकेट लेस राहिल्यावर तिने पाच सान्यांच्या मालिकेत संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेत श्रीलंकेविरुद्धची मालिका गाजवली.

या कामगिरीनंतर आता ती हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील WPL फ्रँचायझी टी-२० क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

जी. कमलिनी दुखापतीमुळे WPL च्या यंदाच्या हंगामातून बाहेर पडली आहे. तिच्या जागी मुंबई इंडियन्सनं वैष्णवी शर्मासाठी "ही पोरी कोणाची...ही पोरी मुंबई इंडियन्सची" हे यंदाच्या हंगामासाठीचे खास गाणं वाजवलं आहे.

दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाने ३० लाख या मूळ किंमतीही तिला संघात घेतले आहे. उर्वरित तिला किती संधी मिळणार? यात ती कशी छाप सोडणार ते पाहण्याजोगे असेल.

भारतीय महिला संघाकडून पदार्पण केल्यावर वैष्णवी शर्मानं कर्णधार हरमनप्रीत कौरसह खास सेलिब्रेशनमुळे मैफिल लुटली होती.

WPL च्या यंदाच्या हंगामात या दोघींच्यातील खास बाँडिंग आणि सेलिब्रेशनचा खास नजारा किती वेळा पाहायला मिळणार तेही लक्षवेधी असेल.